सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे आदी मान्यवरांसह शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराज यांनी केले. तसेच त्यांनी आपल्या लेखनातून समाज प्रबोधनाचे काम केले .
