Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘जाऊ बाई गावात’ मध्ये देवदत्त नागे घेऊन आला बैलगाडा शर्यतचा टास्क

झी मराठीवरील ‘जाऊ बाई गावात’ हा शो सध्या चर्चेचा विषय आहे, काही भागातच या कार्यक्रमाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. ‘जाऊ बाई गावात’ मध्ये पाहुणा आला म्हणजे एक धमाकेदार टास्क असणारच. कोंबडी च्या टास्क मधून स्पर्धक निघाले आणि थेट बैलगाडा शर्यताच्या मैदानात पोहचले. स्पर्धकांना गावकऱ्यांसोबत राहून पाच दिवसच झाले आहेत आणि काही स्पर्धकांना जाणीव व्हायला लागली छोट्या छोट्या गोष्टी ज्या शहरात त्यांच्यासाठी खूप सहजपणे उपलब्ध आहेत त्या गावाकडे किती कठीण आहेत. कष्ट घेऊन सुख मिळवण्यामध्ये काय आनंद असतो हे शिकतायत ह्या शहरी मुली. ‘जाऊ बाई गावातचा’ वीकएंड खास एपिसोड मध्ये बैलगाडा शर्यतीत कोण यशाचा झेंडा फडकावणार, ते वेळच सांगेल. ही शर्यत तर फक्त एक सुरवात आहे. वीकएंड खास भागात ‘जाऊ बाई गावातच ‘ पाहिलं एलिमिनेशन होणार आहे. कोणाचा प्रवास थांबणार खेळातल्या पहिल्या आठवड्यातच.

मनोरंजनाची ही रंगतदार आतिषबाजी पाहायला विसरू नका ‘जाऊ बाई गावात’ सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading