Friday, June 19, 2026
Latest NewsSports

खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत कोल्हापूर अ संघाला विजेतेपद 

पुणे : रग्बी इंडिया, स्पोर्टस ॲथोरिटी ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलींच्या गटात कोल्हापूर अ संघाने विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत
कोल्हापूर अ संघाने नाशिक संघाचा ४५-०० असा एकतर्फी पराभव करून विजेतेपद पटकावले. विजयी संघाकडून नम्रता १५, नेहा १०, तृप्ती १०, समृद्धी ५, अनुष्का ५) यांनी सुरेख कामगिरी केली.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोल्हापूर अ संघाने मुंबई स्टेकर्स संघाचा २४-०५ असा तर, नाशिक संघाने ठाणे अ संघाचा २६-०५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबई स्टेकर्स संघाने ठाणे अ संघाचा ५३-०५ असा पराभव तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र सरकार सह संचालक सुधीर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: १८ वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
कोल्हापूर अ: २४ (समृद्धी १०, नम्रता ५, अनुष्का ५, नेहा ४) वि.वि. मुंबई स्टेकर्स: ५ (कायरा ५);
नाशिक: २६ (ईश्‍वरी १०, स्वाती ११, स्नेहल ५) वि.वि.
ठाणे अ: ५ (अदिती ५)
अंतिम फेरी: कोल्हापूर अ: ४५ (नम्रता १५, नेहा १०, तृप्ती १०, समृद्धी ५, अनुष्का ५) वि.वि. नाशिक: ०.
तिसरे आणि चौथे स्थान:
मुंबई स्टेकर्स: ५३ (कायरा १५, लावण्या 10, सांचल 5, रुतुजा 5) वि.वि.ठाणे अ: ५(अदिती 5).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading