अनेकविध कार्यक्रमांनी सेवासदन दिलासा कार्यशाळेत साजरा झाला दिव्यांग सप्ताह
संपूर्ण सप्ताहात कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या लगोरी फोडणे, बादलीत बॉल टाकणे, गोष्ट सांगणे, गाणं म्हणणे, कॅरम खेळणे, पझल लावणे, पाककलेची कृती सांगणे, एखाद्या शब्दावरून माहिती सांगणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ५ डिसेंबर रोजी कार्यशाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाउन यांच्याकडून विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाउनच्या पदाधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला. ६ डिसेंबर रोजी कार्यशाळेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यानंतर सुरेंद्र माजगावकर यांनी मॅजिक शो सादर केला.
सप्ताहाचा समारोप बाळकृष्ण नेहरकर यांच्या फन फेअर गेम्स आणि ऑर्केस्ट्राच्या मेळाव्याने झाला. यामध्ये दिवसभर गेम्स, मजा, स्नेहभोजन आणि बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण सप्ताहाचा विद्यार्थी आणि पालकांनी आनंद घेतला.
