अक्षराचा जीव धोक्यात !
चारुहासचे कोडं कसं सोडवायचं ह्या विचारात अक्षरा गुंतलेली आहे. चारुहास एक डायरी गपचूप अक्षराला देतो ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की त्यांना मदत हवी. अक्षराला समजेनास होतं हे नेमकं काय आहे, आणि काय मदत त्यांना हवेय अक्षरा आज्जीला चारुहास कुठच्या तरी समस्येमध्ये असल्याचं सांगते. अक्षराची चारुहासच्या विषयातली लुडबुड पाहून भुवनेश्वरीचा संताप होतो, अक्षरा, अक्षरा चारूहासची मदत करण्याचा आणखी एक प्रयत्न करते. त्याच वेळी अक्षरावर कोणीतरी हल्ला करतं. कोण आहे जो अक्षराच्या जीवावर उठला आहे. अक्षराचं चारुहास वरून लक्ष विचलित करण्यासाठी भुवनेश्वरीचा हा नवीन डाव तर नसेल? चारुहासच्या मदतीच्या हाकेला मिळेल का अक्षराचा मदतीचा हात?
‘तुला शिकवीन चांगलाच धडाच्या’ रोमांच वळणवर काय होणार पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार रात्री ८:०० वाजता झी मराठी वाहिनीवर.
