Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENTLatest News

हार्दिक जोशीवर मुक्ताने चढवला आवाज.

“जाऊ बाई गावातमध्ये ‘ आला नवा पाहुणा, घेऊन स्पर्धकांसाठी पाहिलं कार्य”

‘जाऊ बाई गावात’ खेळ नुकताच सुरू झाला आणि सर्वात पहिले गावात जाण्याचा मान मिळवणाऱ्या मुक्ताचा संयमचा बांध ही तुटला. ऐशोआरामाच राहणं सोडून आलेल्या ह्या मुली गावच्या वातावरणात राहण्याच्या कसोटीवर कश्या उभ्या राहणार. जाऊ बाई गावातची स्पर्धक मुक्ताने गावातल्या आजीवर तर आवाज चढवला पण तिला तिची चुकू सांगत असताना कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक हार्दिक जोशीशी ही ती उद्धटपणे वागली.
ही तर सुरवात आहे, कारण प्रत्येक नवीन दिवस ह्या स्पर्धकांसाठी कसोटीचा असणार आहे, कारण आता सर्व स्पर्धकांची वाट पाहत आहेत गावच्या कोंबड्या. हे खास कार्य घेऊन आली आहे क्रांती रेडकर जिचं कोंबड्याशी जुने नातं आहे.
हे स्पर्धक ह्या कार्यामध्ये यश मिळवू शकतील? मुक्ताच्या उद्धट पणाचा दुसऱ्या स्पर्धकांना त्रास भोगावा लागेल? की मुक्ता खेळाचं मैदान खेळ सुरु होण्याआधीच सोडून जाईल?

प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आता मजा येणार, जेव्हा हे स्पर्धक एक गावकरी बनून कार्य करणार. मनोरंजनाची ही रंगतदार आतिषबाजी पाहायला विसरू नका ‘जाऊ बाई गावात’ सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading