Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘चला मुलांनो आंबेडकर जाणूयात; महामानवास अभिवादन करूया’

 

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे ‌‘चला मुलांनो आंबेडकर जाणूयात; महामानवास अभिवादन करूया’ हा अभिनव उपक्रम राबवित शालेय विद्यार्थिनींना डॉ. बाबासाहेब यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली.

सहा डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या निमित्त साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा राजगुरू विद्यालय पांडवनगर व प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी सिम्बायोसिस महाविद्यालयाशेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयास भेट दिली. या वेळी साहित्यिक भालचंद्र सुपेकर यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थिनींनी संग्रहालयाची पाहणी केल्यानंतर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. सुपेकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील काही रोचक प्रसंग विद्यार्थिनींना कथन करून शिक्षणाचे महत्त्व विशद केले. सुरुवातीस उपक्रमाच्या आयोजनामागील भूमिका पियुष शहा यांनी कथन केली. हुतात्मा राजगुरू विद्यालयातील शिक्षक एम. एन. दरे, ए. एस. वडेकर, आर. एस. पंधे, डी. आर. चौधरी, सी. एम. शेळके, पूनम भुवड या प्रसंगी उपस्थित होते. सुपेकर यांचा सन्मान दरे यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading