School bus accident : स्कूल बस झाडावर आदळून भीषण अपघात; विद्यार्थी जखमी
पुणे : पुणे शहरातील वाघोली ( Wagholi ) येथील एका शाळेची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात (School Bus Accident) झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये अनेक लहान विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज (दि. 5) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे.
असा झाला अपघात –
वाघोली परिसरात रायझिंग स्टार (Rising Star School ) नावाची शाळा आहे. या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी या बसमधून निघाले होते. दरम्यान ही स्कूल बस शाळेत जात असताना सकाळी आठ वाजता लोणीकंद परिसरात झाडाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, बस मधील विद्यार्थी पुढे ढकलले गेले. अनेक विद्यार्थी यामध्ये जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यामुळे मूलांना सावरण्यास मदत झाली.
दरम्यान, या आपघाटाचे CCTV फुटेज समोर आले असून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे कळत आहे.
