Monday, August 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली, तसेच येथे करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, हवेली गट विकास अधिकारी भुषण जोशी आदी उपस्थित होते.

पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळतील यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, विद्युत प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, गर्दीचे व वाहतुकीचे नियोजन याविषयी माहिती घेण्यात आली.

या भेटीच्या वेळी विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपास्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading