Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

भीमा कोरेगाव विजयस्तंभास 200 कोटी द्या – सर्जेराव वाघमारे

पुणे : भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली पण पाच वर्षानी ही अजून निधी मिळाला नाही , तसेच भीमा कोरेगाव दंगलीनंतर झालेल्या आंदोलांत व भारत बंद मध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यरत्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे घोषित करुन ही अजून गुन्हे मागे घेतले नाही या दोन्ही मागण्यासाठी आज पुण्यात कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करून मागण्या मान्य होईपर्यत आमरण उपोषण करण्याचा निर्धार अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी केला .

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी भिमसैनिकावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणे व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री धनंजय मुंडे यांनी विजयस्तंभासाठी १०० कोटी रु. चे अनुदान जाहीर केले ते त्वरीत मिळावे ,कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत .उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, व धनंजय मुंडे यानी विजयस्तंभाच्या विकासासाठी, १०० कोटी रुपये. मंजूर केले होते. ते आजतागायत मा. जिल्हाधिकारी यांना वर्ग करणेत आले नाहीत. ते १०० कोटी वरुन विकासकामासाठी २०० कोटी रु. निधी त्वरीत मंजूर करावा व विजयस्तंभाच्या विकासासाठी इतर जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रीया त्वरीत चालू करावी. या दोन प्रमुख मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करुन आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली .या

आंदोलनात कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे ,दिपक थोरात ,सामाजिक कार्यकर्त पंकज साबळे ,पंचशिल चॅरीटेबल ट्रस्ट अध्यक्ष समीर जाधव, दीक्षांत भालेराव, अमोल गायकवाड, अंजना गायकवाड, सुजित गिरी, सकिभाऊ गायकवाड, दिपंकर इंगोले.दीपक शिंदे, किशोर भोंडे, निलेश गायकवाड, अखिल भाई मुजावर. रुहिनाझ शेख, रुपेश गायकवाड, राहुल कदम, कमलेश निकाळजे व पुणे शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading