Tuesday, September 1, 2026
Latest NewsLIFESTYLE

एकत्व फॅशन शोने जिंकली पुणेकरांची मने

पुणे  : फॅशन डिझायनर विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावं या उद्देशाने नॅशनल स्कूल ऑफ स्किल फाउंडेशन यांच्या वतीने फिनिक्स मार्केट सिटी पुणे येथे एकत्व फॅशन शो चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सर्जनशील मनाने तयार केलेली फॅशन डिझायनिंग कलाकृतीला चालना मिळावी त्यांचा उत्साह वाढला जावा यासाठी दिमाखदार पद्धतीने फॅशन शो पुण्यात नुकताच रंगला.

विविध कलाकृतीने बहरलेल्या फॅशन शोमध्ये आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करणाऱ्यां युवतींनी उपस्थितांकडुन टाळ्यांची दाद मिळवली. यावेळी पुणे महानगरपालिकाचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नामवंत फॅशन डिझायनर, निखिल माळवदे, मुग्धा माळवदे, नामवंत डिझायनर महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी फॅशन, ग्लॅमर आणि स्टाइलच्या माध्यमातून सुंदर अशा ताजमहाल, मोहक फ्लोन्स- रफल्स, आग आणि बर्फ, बनारसी संस्कृती, आकाशगंगा या पाच प्रकारच्या मनमोहन संकल्पनेतून विद्यार्थींनी साकारलेल्या विविधतेतून एकता दाखवणारा हा फॅशन शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

नॅशनल स्कूल ऑफ स्किल्स फाउंडेशन २०१७ पासून फॅशन डिझाईन, इंटिरियर डिझाइन,ॲनिमेशन आणि व्हिएफएक्सच्या पदवी/डिप्लोमा अभ्यासक्रमांसह विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणाची सुविधा देत आहे.एकत्व फॅशन शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांची प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी NSS फाऊंडेशन कायमच कटीबद्ध असते अशी भावना निखिल माळवदे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading