Thursday, June 18, 2026
Latest NewsSports

पुण्याच्या फिटमोर हॉस्पिटल संघाला विजेतेपद !!

पुणे :  यंग डॉक्टर्सं लीग (वायडीएल) यांच्या तर्फे आयोजित देशातील पहिल्या ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ राष्ट्रीय स्पर्धेच्या क्रिकेटमध्ये पुण्याच्या फिटमोर हॉस्पिटल संघाने पालघरच्या विनायक हॉस्पिटल संघाचा ३२ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना क्लब मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फिटमोर हॉस्पिटल संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १० षटकामध्ये ५ गडी गमावून ११९ धावा अशी विशाल धावसंख्या उभी केली. अविनाश गावडे याने २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. फिरोझ शेख (२५ धावा) आणि प्रणव कदम (१८ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. या आव्हानासमोर विनायक हॉस्पिटल संघाचा डाव ८७ धावांवर मर्यादित राहीला. सागर गवळी याने ३४ धावांची खेळी केली. चेतन चौधरी आणि अविनाश गायकवाड यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय साकार केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी महाराष्ट्र रणजीपटू आणि माजी राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य सुरेंद्र भावे, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष विकास काकतकर, कोटी भास्करचे दिलीप कोटीभास्कर आणि जयवंत भावे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ (आयडीएल) समितीचे अध्यक्ष डॉ. नचिकेत महींद्रकर आणि सचिव डॉ. अमित द्रविड, डॉ. चिन्मय सराफ आदि मान्यवर उपस्थित होते.

अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
फिटमोर हॉस्पिटलः १० षटकात ५ गडी बाद ११९ धावा (अविनाश गावडे ५१ (२३, ४ चौकार, ३ षटकार), फिरोझ शेख २५, प्रणव कदम १८, अमीर बदाम २-२०) वि.वि. विनायक हॉस्पिटल पालघरः १० षटकात ७ गडी बाद ८७ धावा (सागर गवळी ३४, गुड्डू शेख ११, चेतन चौधरी २-११, अविनाश गायकवाड २-५); सामनावीरः अविनाश गावडे;

उपांत्य फेरीः रॅडीएन्ट हॉस्पिटलः १० षटकात ८ गडी बाद १०५ धावा (उमेश सोनावणे ४४, चंद्रकांत बोरसे ३१, अमित मिश्रा २-७) पराभूत वि. फिटमोर हॉस्पिटलः ९.१ षटकात ५ गडी बाद १०८ धावा (अविनाश गावडे ४०, प्रणव कदम ३८, सचिन मोकल १५, चंद्रकांत बोरसे २-९); सामनावीरः प्रणव कदम;

बारामती सुपरकिंग्ज्ः १० षटकात १० गडी बाद ७० धावा (केशव जयभय १४, अंबाजी देशपांडे १३, अजित पवार १३, गुड्डू शेख ३-१५, रोहीत किणी २-९, झहीर तुर्की २-६) सुपर सोव्हरमध्ये पराभूत वि. विनायक हॉस्पिटलः १० षटकात ९ गडी बाद ७० धावा (गुड्डू शेख १४, सागर गवळी ११, भुषण खुरांगे २-७, कृष्णा गरूड २-९); सामनावीरः गुड्डू शेख;
सुपर ओव्हरः विनायक हॉस्पिटलः १ षटकात १ बाद १३ धावा (आशितोष गंधारी ७, गुड्डू शेख ६, अर्जुन तोडकर १-१३) वि.वि. बारामती सुपरकिंग्ज्ः १ षटकात १ गडी बाद ८ धावा (अक्षय कोलते ६, अमीर बदाम १-६);

वैयक्तिक पारितोषिकेः

मालिकेचा मानकरीः अविनाश गावडे (२०२ धावा, ४ विकेट, फिटमोर हॉस्पिटल);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः आशितोष गधारी (१७५ धावा, विनायक हॉस्पिटल);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः चेतन चौधरी (१४ विकेट, फिटमोर हॉस्पिटल);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading