Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

हेमंत रासने यांच्या पुढाकाराने 3 वर्षांच्या आदिश्रीवर मोफत उपचार

पुणे : तीन वर्षांची आदिश्री गायकवाड ही तिच्या हृदयातील छिद्रामुळे आजारी होती. हृदयाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते, परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती शस्त्रक्रियेच्या खर्चाला परवडणारी नव्हती. आदिश्रीच्या आईवडिलांची चिंता वाढली होती. त्यांना कसे तरी आपल्या मुलीचे आयुष्य वाचवायचे होते.

ही परिस्थिती हेमंत भाऊ रासने यांना कळविण्यात आल्यानंतर त्वरीत त्यांनी जहांगीर हॉस्पिटलचे डॉ. भोने यांच्याशी संपर्क साधला आणि आदिश्रीची शस्त्रक्रिया मोफत करून देण्याची विनंती केली. डॉ. भोने यांनी हेमंत भाऊंच्या विनंतीचा मान ठेऊन आदिश्रीची शस्त्रक्रिया मोफत करण्याची तयारी केली.

हेमंत भाऊ यांच्या मुळे आदिश्रीच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली. त्यांच्या मदतीमुळे आदिश्री आता निरोगी आणि आनंदी आहे. हेमंत भाऊ हे समाजातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्यासारखे समाजसेवक असल्याने समाजात गरिब आणि दुर्बल घटकांसाठी एक आशेचा किरण निर्माण होतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading