Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

मोदींच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास : मुरलीधर मोहोळ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास आहे, यावर या निकालाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. मोदींवर कॅांग्रेसने अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. ही टीका देशवासियांना रुचली नाही, हे या निकालाने सिद्ध झाले आहे. मोदींच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे पुणे लोकसभा निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

मोहोळ म्हणाले, मोदींच्या गरीब कल्याणाच्या आणि विकासाच्या अजेंड्यापुढे कॅांग्रेसचा खोट्या आश्वासनांचा अजेंडा निष्प्रभ ठरला आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक घटकाचे मनापासून अभिनंदन. देशातील मतदारांचा हा ट्रेंड पुणे लोकसभेतही कायम असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी उत्सुक आणि सज्ज आहोत

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading