Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

कोण घेणार माघार? राजवर्धन की रत्नमाला?

सध्या ‘भाग्य दिले तू मला’ मध्ये आई मुलाचा वाद टोकाला पोहोचला आहे. तत्त्वनिष्ठ असलेली रत्नमाला आणि वडिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारा राजवर्धन हे या वादाचं कारण आहे. २० वर्षांनंतर परत आलेले वडिलांना भूतकाळात काही गोष्टींचा सामना करावा लागला होता याला कारणीभूत होती आई म्हणजेच रत्नमाला म्हणून आईवर असलेला राग तसेच इतक्या वर्ष वडिलांना काय झालं होतं? ते कुठे होते? हे रत्नमालाने मुलापासून लपवलेलं त्यामुळे द्विगुणीत झालेला राग. त्यासाठीच राजवर्धनने घेतलेली वडिलांची बाजू जी एका दृष्टीने अयोग्य ही असू शकते.

याचं कारण की, २० वर्ष ज्या माणसाचा जगाशी संबंध नव्हता त्याच माणसाच्या हातात प्रसिद्ध माहेरचा चहाचा बिझनेस सोपवणं रत्नमालाला योग्य वाटत नाही. आता राजवर्धन वडिलांसाठी आईशी लढतो आहे हे योग्य आहे की रत्नमाला तिच्या तत्वांशी तडजोड नकरता पुढे जातेय व अनिरुद्धला माहेरचा चहा मध्ये पदवी देण्यास विरोध करते हे योग्य आहे? यापैकी आता कोण जिंकणार? दोघांपैकी कोण माघार घेणार? हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कावेरी कोणाची बाजू घेईल? राजवर्धनने याआधी ही तिला विचारले होते की तुला आईची साथ द्यायची की माझ्यासोबत येणार आहेस? आणि एकीकडे तिने रत्नमालाला वचन दिलं आहे की काही ही झालं तरी मी घर तुटू देणार नाही. पण कावेरीने समतोल सांभाळत ठरवलं आहे की या घरातल्या सगळ्या मंडळींसोबत असेल.

या आई-मुलाच्या वादात कावेरी कसं सगळं संभाळून हे कुटुंब परत आणते, त्यासाठी तिला काय काय संकटांना सामोरं जाव लागले हे पाहण्यासाठी उद्या नक्की पाहा, भाग्य दिले तू मला, महारविवार, दु. १.०० व रात्री. ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading