सिंहगड लायन्स्, जागृती रेहाब इलेव्हन, टायटन्स् इलेव्हन, यंग डॉक्टर्स लीग संघ अ, बारामती सुपरकिंग्ज्, विनायक हॉस्पिटल इलेव्हन उपांत्यपुर्व फेरीत !!
पुणे : यंग डॉक्टर्सं लीग (वायडीएल) यांच्या तर्फे आयोजित देशातील पहिल्या ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ राष्ट्रीय स्पर्धेच्या क्रिकेटमध्ये सिंहगड लायन्स्, जागृती रेहाब इलेव्हन, टायटन्स् इलेव्हन, यंग डॉक्टर्स लीग संघ अ, बारामती सुपरकिंग्ज् आणि विनायक हॉस्पिटल इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेचे सामने पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना क्लब, व्हिजन क्रिकेट अॅकॅडमी-सिंहगड रोड, स्केलअप अॅकॅडमी मैदान-वारजे, डीएसके स्टार क्रिकेट अॅकॅडमी-धायरी आणि शिंदे हायस्कूल-सहकारनगर अशा विविध मैदानांवर सुरू आहे.
महेश रोहीने याच्या ७७ धावांच्या जोरावर जागृती रेहाब इलेव्हन संघाने लातूर अॅव्हेंजर्सचा ८६ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळताना जागृती संघाने १३१ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये महेश रोहीने याने २६ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटरांसह ७७ धावा चोपल्या. रोहीत बारमुख याने ३४ धावां काढून महेशला उत्तम साथ दिली. या आव्हानासमोर लातूर अव्हेंजर्सचा डाव ४५ धावांवर गडगडला.
सुशील सोनावणे याच्या फलंदाजीच्या जोरावर टायटन्स् इलेव्हनने कोकण टायगर्सचा ७ गडी राखून सहज पराभव केला. निलेश पाटील याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यंग डॉक्टर्स लीग संघ अ संघाने सातारा स्ट्रायकर्स इलेव्हनचा ७ धावांनी पराभव करून आगेकूच केली. निलेश पाटील याने १० धावात ४ गडी बाद केले.
सामन्याचा संक्षिप्त निकालः उप-उपांत्यपुर्व फेरीः
जागृती रेहाब इलेव्हनः ८ षटकात ३ गडी बाद १३१ धावा (महेश रोहीने ७७ (२६, ९ चौकार, ५ षटकार), रोहीत बारमुख ३४, गणेश डेंगे १-२०) वि.वि. लातूर अव्हेंजर्सः ७.४ षटकात १० गडी बाद ४५ धावा (अशोक डाके ७, झुंझार कदम ३-१०, सागर वाबळे २-२, मयुर मुकूंद २-७); सामनावीरः महेश रोहीने;
कोकण टायगर्सः ८ षटकात ३ गडी बाद ८७ धावा (नितीन भगत ३६, अफशीर खान १६, उदय चव्हाण नाबाद १४, निर्मल पाटील १-१५) पराभूत वि. टायटन्स् इलेव्हनः ७.३ षटकात ३ गडी बाद ९० धावा (सुशिल सोनावणे २९, रौनक महाजन २६, पराग भोले २६, अफशीर खान २-१९); सामनावीरः सुशील सोनावणे;
यंग डॉक्टर्स लीग संघ अः ८ षटकात ५ गडी बाद ७६ धावा (निलेश पाटील २८, अमोल मय्यार २७, अभय जाधव २-१७) वि.वि. सातारा स्ट्रायकर्स इलेव्हनः ८ षटकात ६ गडी बा ६९ धावा (मोहसीन गिरासे २७, प्रसन्ना गायकवाड १६, निलेश पाटील ४-१०); सामनावीरः निलेश पाटील;
आयएमए अमरावतीः ८ षटकात ९ गडी बाद ४३ धावा (मोहनिश गोटमारे १३, दिनेश वाघडे १०, सुरज मिसाळ २-३, प्रशांत पाटील २-८) पराभूत वि. बारामती सुपरकिंग्ज्ः २.२ षटकात १ गडी बाद ४६ धावा (अजित पवार नाबाद २२, अक्षय कोलते २२); सामनावीरः सुरज मिसाळ;
विनायक हॉस्पिटलः ८ षटकात ५ गडी बाद १०२ धावा (आशितोष गढारी ३४, कपिल पाटील ३०, धनराज काणे २०, अभय कावेडीया २-१५, अक्षय भांगिरे २-१६) वि.वि. ससून इलेव्हनः ८ षटकात ५ गडी बाद ७६ धावा (उमेश मुंडे २३, अनिकेत सोनावणे १४, सागर गवळी २-१६); सामनावीरः सागर गवळी;
रॅडीएन्ट हॉस्पिटलः ८ षटकात ६ गडी बाद ९३ धावा (उमेश सोनावणे २८, आदील जुनेद २२, अमित घुले नाबाद २२, गौरव कर्वे ३-२५) वि.वि. यंग डॉक्टर्स लीग संघ बः ८ षटकात ६ गडी बाद ६४ धावा (गौरव कर्वे नाबाद ३७, चंद्रकांत शेवाळे २-७, रविंद्र कुंटे २-५); सामनावीरः चंद्रकांत शेवाळे;
हडपसर वॉरीयर्सः ८ षटकात ७ गडी बाद ६२ धावा (विनोद काब्बिरे २५, विशाल तरांगे १९, चेतन चौधरी ३-१७) पराभूत वि. फिटमोज् हॉस्पिटलः ५.४ षटकात ३ गडी बाद ६३ धावा (निलेश साळुंखे ३७, अविनाश गवळी १९, रोहन देशपांडे २-१०); चेतन चौधरी;
सीएसके ब्लास्टर्सः ८ षटकात ४ गडी बाद ७० धावा (फराझ खान २५, सतिश दौंड १४, संदीप नांद्रे २-८) पराभूत वि. सिंहगड लायन्स्ः ७.२ षटकात ४ गडी बाद ७१ धावा (विशाल बोरा नाबाद २६, अमित शिंदे १४, अमर क्रांतीवीर १२, अरविंद घुुले १-९); सामनावीरः विशाल बोरा;
