Monday, August 31, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीतील संघांची घोषणा


पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील संघांची घोषणा करण्यात आली असून महाअंतिम फेरी दि. 27 डिसेंबर ते दि. 29 डिसेंबर या कालावधीत पुण्यात होणार आहे. पुण्यासह कोल्हापूस, रत्नागिरी, संभाजीनगर आणि अमरावती विभागातील एकूण 19 संघांचे सादरीकरण होणार आहे.

स्पर्धेची महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिरात होणार आहे. दि. 27 आणि दि. 28 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळात तर दि. 29 रोजी सकाळी सकाळी 9 ते दुपारी 1 अशा पाच सत्रात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते होणार आहे.

महाअंतिम फेरीतील संघ पुढील प्रमाणे : पुणे विभाग : टिळक आयुर्वेद महाविद्यालय (पिक्सल्स), सर परशुरामभाऊ महाविद्यालय (कृष्णपक्ष), मराठवाडा विधी महाविद्यालय (रवायत ए विरासत), मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड (फेलसेफ).
कोल्हापूर विभाग : देशभक्त रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालय (असणं नसणं), प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर (पाहिजे म्हणजे पाहिजे), महावीर महाविद्यालय (निर्झर), शहाजी लॉ कॉलेज (जंगल जंगल बटा चला है).
रत्नागिरी विभाग : डी. बी. जे. महाविद्यालय (हॅपी फादर्स डे), फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय (बोबड्या), स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय (वन पीस).

संभाजीनगर विभाग : देवगीरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग (खळगं खळगं), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (चुकलं तर माफ करा), डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग (अल्प भूधारक), प्रताप महाविद्यालय (तो पाऊस आणि टाफेटा).
अमरावती विभाग : प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड रिसर्च (साकव), वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (समांतर), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (रात्र अंधार), डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे कला व वाणिज्य महाविद्यालय (न्यायालयात जाणारा प्राणी).
महाअंतिम फेरीमध्ये पहिल्यांदाच आलेले संघ : महावीर महाविद्यालय, कोल्हापूर (निर्झर), शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर (जंगल जंगल बटश चला है), मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे (रवायत ए विरासत), मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फेलसेफ), प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर (पाहिजे म्हणजे पाहिजे), टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे (पिक्सल्स), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (रात्र अंधार).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading