आयआयएफएल समस्ताच्या रोख्यांची विक्री ४ डिसेंबर पासून
पुणे :- भारतातील सर्वात मोठ्या नॉन-बँकिंग मायक्रोफायनान्स कंपन्यांपैकी (एनबीएफसी-एमएफआय) एक असलेली आयआयएफएल समस्ता फायनान्स व्यवसाय वृद्धी आणि भांडवल वाढ करण्याच्या उद्देशाने सुरक्षित रोख्यांच्या (बाँड्स) पहिल्या सार्वजनिक विक्रीतून १,००० कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारणार आहे. हे रोखे १०.५०% पर्यंत परतावा आणि उच्च दर्जाची सुरक्षितता ऑफर करतात. ही रोखेविक्री सोमवार, दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी सुरू होईल आणि शुक्रवार, दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी बंद होईल. आयआयएफएल समस्ता ही ७३,०६६ कोटी रुपयांची कर्ज मालमत्ता व्यवस्थापित करणाऱ्या आयआयएफएल फायनान्सचा एक भाग आहे, जी भारतातील सर्वात मोठी रिटेल-केंद्रित एनबीएफसी आहे. (Sale of IIFL Samasta bonds from 4th December)
आयआयएफएल समस्ता फायनान्स ८०० कोटींपर्यंतचे ओव्हर-सबस्क्रिप्शन राखत ग्रीन-शू पर्यायासह २०० कोटी रुपयांचे रोखे (एकूण रु. १,००० कोटी) जारी करेल. आयआयएफएल समस्ता रोखे हे ६० महिन्यांच्या कालावधीसाठी १०.५०% वार्षिक दराने सर्वोच्च कूपन दर प्रदान करतात. हे एनसीडी २४ महिने, ३६ महिने आणि ६० महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत. व्याज पेमेंटची वारंवारता प्रत्येक सिरिजसाठी मासिक आणि वार्षिक आधारावर उपलब्ध आहे.
तर याची क्रेडिट रेटिंग क्रिसिल रेटिंग्स लिमिटेडद्वारे क्रिसिल एए -/पॉझिटिव्ह आणि एक्युइट रेटिंग्स आणि रिसर्च लिमटेडद्वारे अॅक्युइट एए| स्टेबल आहे, जे हे सूचित करते की आर्थिक दायित्वे वेळेवर पूर्ण करण्यासाठी हे रोखे सर्वाधित सुरक्षित मानली जातात. तसेच खूप कमी क्रेडिट जोखीम बाळगतात. शिवाय आयआयएफएल समस्ताला या महिन्याच्या सुरुवातीला क्रिसिलकडून ‘स्थिर’ वरून ‘पॉझिटिव्ह’ असे रेटिंग आउटलुक प्राप्त झाले.
पुण्यात या रोख्यांबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना रवि पांडे, प्रमुख, रिटेल अॅसेट, आयआयएफएल समस्ता फायनान्स म्हणाले, की, आयआयएफएल समस्ता फायनान्सचे सुमारे १५०० शाखांच्या माध्यमातून संपूर्ण भारतात मजबूत भौतिक अस्तित्व आहे. हे एका चांगल्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओद्वारे अल्पसंख्याक आणि सेवा न मिळालेल्या लोकांच्या, प्रामुख्याने वंचित पार्श्वभूमीतील महिला उद्योजकांच्या पत गरजा पूर्ण करते. उभारलेल्या निधीचा वापर अशा अधिक ग्राहकांची क्रेडिट मागणी पूर्ण करण्यासाठी आणि व्यवसायाच्या वाढीला चालना देण्यासाठी केला जाईल.
जेएम फायनान्शियल लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या रोखेविक्रीचे प्रमुख व्यवस्थापक आहेत. गुंतवणूकदारांना तरलता प्रदान करण्यासाठी हे एनसीडी बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर (एनएसई) सूचीबद्ध केले जातील. आयआयएफएल बाँड्स रु. १,००० च्या दर्शनी मूल्यावर जारी केले जातील आणि सर्व श्रेणींमध्ये अर्जाचा किमान आकार रु.१०,००० इतका असेल. ही सार्वजनिक रोखे विक्री सोमवार, दि. ०४ डिसेंबर २०२३ रोजी सुरू होईल आणि लवकर बंद करण्याच्या पर्यायासह शुक्रवार, दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी बंद होईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर रोखे वाटप केले जाईल.
