Thursday, September 3, 2026
BusinessLatest News

विविध मुदतीसाठी मुदत ठेव दरात दर बँक ऑफ इंडियाकडून वाढ

मुंबई : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी (रु. 2 कोटी आणि त्याहून अधिक ते १० कोटींपेक्षा कमी) त्यांच्या मुदत ठेवींचे व्याज दर वाढवले आहेत. यासाठी “46 दिवस ते 1 वर्षापर्यंत”चा कालावधी आहे. 1 डिसेंबर 2023 पासून हे दर लागू होतील. (Bank of India increase in fixed deposit rates for various tenors)

बँकेने कमी कालावधीसाठी मुदत ठेवींचे दर वाढवले आहेत, म्हणजे 46 दिवस ते 90 दिवस कालावधीसाठी 5.25%, 91 दिवस ते 179 दिवस कालावधीसाठी 6.00%, 180 दिवस ते 210 दिवस कालावधीसाठी 6.25%, 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 6.50% आणि 1 वर्षासाठी 7.25%. बँकेने दिलेला सध्याचा व्याजदर स्पर्धात्मक आहे, HNIs, लघु आणि मध्यम कॉर्पोरेट्स, NRIs आणि व्यावसायिक स्वयंरोजगार इत्यादींकडून गुंतवणूकीसाठी अतिशय आकर्षक परतावा देत आहेत.

1 नोव्हेंबर 23 पासून बँकेने 2 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या सर्व ठेवींचे दर आधीच वाढवले आहेत. सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक 7.90%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75% आणि इतरांसाठी 2 वर्षांच्या मुदतीसाठी 7.25% पर्यंतचा सर्वोच्च व्याज दर देत आहे. सुधारित व्याजदर देशांतर्गत, NRO आणि NRE रुपया मुदत ठेवींसाठी लागू आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading