Wednesday, July 8, 2026
BusinessLatest NewsPUNE

चिंचवडमध्ये होणार इंडिया इंटरनॅशनल इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : प्रदूषण मुक्त वाहन निर्मिती कडे आज जग वाटचाल करत आहे. इलेक्ट्रिकल वाहनांचा या मध्ये मोलाचं वाटा आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणे अपेक्षित असून वाहन निर्मिती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचे भारताचे केंद्र असलेल्या पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो’ (आयआयईव्ही) या देशातील सर्वात भव्य ईव्ही प्रदर्शनाचे आयोजन १ ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधी मध्ये ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी – चिंचवड, पुणे येथे होणार आहे. नाविन्यता, हरित तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधनाचे केंद्रस्थान ठरेल.
या कार्यक्रमाचे आयोजक यांनी आज पिंपरी- चिंचवड येथे पत्रकार परिषद घेत या प्रदर्शनाची माहिती दिली. ७००० हून अधिक विक्रेते, वितरक, अधिकृत परवानाधारक यामध्ये सहभागी होणार असून ३००० हून अधिक उत्पादने आणि सेवांची यावेळी प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. तसेच ३० हून अधिक नवीन उत्पादनांचे यावेळी प्रक्षेपण होणार आहे. या पत्रकार परिषदेस सतीश मंडोळे, संचालक- ग्लोबटेक मीडिया, सतीश कुमार, मार्केटिंग व्यवस्थापक- फ्युचरेक्स, मुकेश यादव, प्रोजेक्ट हेड फ्यूचरेक्स, विलास रबडे आणि हेमंत पाध्ये, टेक फोरम चे उपस्थित होते.

इलेक्ट्रिकल वाहन निर्मिती मध्ये बॅटरी टेक्नॉलॉजी महत्वाची असून. बॅटरी व्यवस्थापन प्रणाली या तंत्रण्यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनात बॅटरी व्यवस्थापन प्रणाली च्या १३ तज्ज्ञांची समिती येणार असून विविध विषयांवर ते चर्चा करणार आहेत. चाकण हे औद्योगिक क्षेत्रात कमालीची प्रगती करत असल्यामुळे. या प्रदर्शनाला त्याचा खूप फायदा होणार असल्याचे विलास रबडे म्हणाले . महाविद्यालयीन शिक्षणात बदल करून येणाऱ्या पिढीला टेक्नॉलॉजी विषय जास्त माहिती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.

भारताची इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ आता मर्यादित राहिलेली नाही; हा उद्योग भरभराटीचा असून त्याने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतात सध्या अंदाजे २.८ दशलक्ष इलेक्ट्रिक वाहने वापरात असून ही बाजारपेठ अधिक वाढीसाठी सज्ज झाली आहे. वर्ष २०३० पर्यंत ९४.४ टक्के अशा उल्लेखनीय चक्रवाढ वार्षिक वाढीचा (सीएजीआर) अंदाज असून यातून हे निदर्शनात येते की, इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढतो आहे आणि यातूनच शाश्वत विकासासाठी देशाची वचनबद्धता अधोरेखित होते, अशी माहिती फ्युचर्स ग्रुप इव्हेंट ऑर्गनायझिंग कंपनी चे संचालक नमित गुप्ता यांनी दिली.

गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, २०२१-२२ मध्ये ८,६६८ वाहनांची नोंद झाली होती. प्रमुख वाहन निर्मिती केंद्र असलेले पुणे इलेक्ट्रिक वाहनातील संशोधन, नावीन्यता आणि उत्पादनात आघाडीवर आहे. इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेच्या वाढीमागे उत्पादन, संशोधन आणि विकासातील पुण्याचे कौशल्य हे प्रेरणादायी आहे, ज्यामुळे ‘आयआयईव्ही’चे आयोजन करण्यासाठी हे उत्तम स्थळ आहे. ‘आयआयईव्ही’मध्ये उपस्थितांना अद्ययावत ईव्हीचा अनुभव घेण्याची, तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि इलेक्ट्रिक वाहतुकीचे भविष्य शोधण्याची संधी मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading