Tuesday, July 7, 2026
Latest NewsSports

एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथन याला दुहेरी मुकुट 

 
मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या भारताच्या रामकुमार रामनाथन याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
 
जीए रानडे टेनिस कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये अंतिम फेरीत भारताच्या तिसऱ्या मानांकित रामकुमार रामनाथन याने आपली विजयी मालिका कायम ठेवत सिद्धार्थ विश्वकर्माचा 6-0, 6-4 असा पराभव केला. हा सामना 56 मिनिटे चालला. रामकुमारचे 25000डॉलर आयटीएफ स्पर्धेतील हे सलग दुसरे विजेतेपद आहे. याआधी देवांगरे येथील आयटीएफ स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावले होते.
स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या रामकुमार रामनाथन याला करंडक, 4375डॉलर आणि 25 एटीपी गुण, तर उपविजेत्या सिद्धार्थ विश्वकर्माला करंडक, 2210डॉलर आणि 16एटीपी गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, सहसचिव निखिल संपत, समिती सदस्य अमित श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य, आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: अंतिम फेरी:
रामकुमार रामनाथन (भारत)[3] वि.वि.सिद्धार्थ विश्वकर्मा(भारत)6-0, 6-4.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading