fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsNATIONALPUNE

21 युरोपीय देशांतील उच्च शिक्षण संस्था युरोपियन हायर एज्युकेशन व्हर्च्युअल फेअरमध्ये सहभागी होणार

पुणे : 3D व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म https://study-europe.net/register द्वारे भारतीय विद्यार्थ्यांना आघाडीच्या युरोपियन उच्च शिक्षण संस्थांशी जोडण्यासाठी भारताची 8वी आवृत्ती असलेली युरोपियन उच्च शिक्षण व्हर्च्युअल फेअर (ईएचईव्हीएफ) 23 आणि 24 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित केली जाईल. बल्गेरिया, सायप्रस, झेकिया, डेन्मार्क, एस्टोनिया, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लिथुआनिया, माल्टा, नेदरलँड, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन आणि स्वीडन यासह 21 युरोपियन युनियन (ईयु) सदस्य देशांमधील 73 उच्च शिक्षण संस्था या फेअरला उपस्थित राहणार आहेत.

जगभरातील काही मोजक्याच आणि सर्वोत्तममध्ये गणना होणाऱ्या विद्यापीठांचे युरोप माहेरघर असल्याने भारतीय विद्यार्थ्यांची ते अधिकाधिक पसंती मिळवते. युरोपमध्ये मिळणाऱ्या उच्च शिक्षणाचा दर्जा तर निर्विवाद आहेच पण यासोबतच परदेशी विद्यार्थ्यांना युरोप खंडातील सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेमुळे समृद्ध सांस्कृतिक अनुभवायला मिळते. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकशास्त्र, गणित, कंप्यूटर अँड डेटा सायन्स, व्यवसाय, वित्त, अर्थशास्त्र, आर्किटेक्चर, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि मानवता ते फॅशन, कला, डिझाइन, पाककला आणि चित्रपट अभ्यास असे काही लोकप्रिय अभ्यासक्रम आहेत.. खाली दिलेली प्रशंसापत्रे वाचावीत..

ईएचईव्हीएफच्या या आवृत्तीमध्ये चौदा टॉप-रँकिंग युरोपियन विद्यापीठे (500 टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग 2024 नुसार क्रमवारी झालेली) सहभागी होत आहेत. यामध्ये लुंड युनिव्हर्सिटी आणि लिंकोपिंग युनिव्हर्सिटी (स्वीडन), आरहूस युनिव्हर्सिटी (डेनमार्क), आइंडहोव्हन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि हॅन्झे युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस (नेदरलँड), युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन आणि ग्रिफिथ कॉलेज (आयर्लंड), पॉलिटेक्निको डी मिलानो आणि युनिव्हर्सिटी ऑफ ट्रेंटो (इटली), फ्रेडरिक युनिव्हर्सिटी (सायप्रस), युनिव्हर्सिटी ऑफ लायब्ररी स्टडीज अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज (बल्गेरिया), युनिव्हर्सिटी ऑफ टार्टू (एस्टोनिया), युनिव्हर्सिटी ऑफ नव्हारा (स्पेन), कन्स्ट्रक्टर युनिव्हर्सिटी (जर्मनी) यांचा समावेश आहे.

उच्च शिक्षण आणि विद्यार्थी हे दोन्ही भागांच्या भविष्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ईएचईव्हीएफ 2023 बद्दल बोलताना, भारतातील युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाचे राजदूत H.E. हर्व्ह डेल्फिन म्हणाले, 2022-23 मध्ये 80,000 भारतीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचे ठिकाण म्हणून युरोपियन युनियन निवडले जे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील वाढत्या लोकसंबंधांचा एक भक्कम पुरावा आहे.” ते पुढे म्हणाले, जगातील सर्वोच्च 200 उच्च शैक्षणिक संस्थांपैकी 25% उच्च शैक्षणिक संस्थां युरोपियन युनियन मध्ये असल्याने हे जगातील आघाडीचे ठिकाण आहे. उच्च शिक्षणासाठी युरोपला प्राधान्य देत केलेली निवड म्हणजे सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेचा मिलाफ अनुभवत विद्यार्थी आणि संशोधक त्यांच्या व्यवसायामध्ये पारंगत होतात. मी विद्यार्थ्यांना या अनोख्या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि संपूर्ण युरोपमधील काही सर्वोच्च क्रमवारी असणाऱ्या विद्यापीठांचे अन्वेषण करतो.” इरॅस्मस मुंडस जॉइंट मास्टर प्रोग्रामद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना पूर्ण अनुदानीत असणाऱ्या पदव्युत्तर पदवीसाठी अर्ज करण्याच्या अनेक संधी युरोपियन युनियन देते. या युरोपियन युनियनच्या सदस्याव्यतिरिक्त राज्ये आणि विद्यापीठांचे स्वतःचे शिष्यवृत्ती कार्यक्रम आहेत, ज्यामुळे या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणे आवाक्यामध्ये आले आहे. अनेक युरोपियन विद्यापीठे ट्यूशन-फ्री प्रोग्राम देखील देतात आणि विद्यार्थ्यांसाठी प्रवेशयोग्यता सुनिश्चित करतात. तसेच, संशोधकांच्या गतिशीलतेसाठी प्रसिद्ध मेरी स्कोडोव्स्का-क्युरी अ‍ॅक्शन्स सारखी असंख्य पदे उपलब्ध असल्याने शैक्षणिक आणि वैज्ञानिक विकासाच्या संधी उपलब्ध आहेत. मास्टर्स आणि डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुतेक वेळा विनामूल्य शिक्षणाचा मिळते आणि काही वेळा, त्यांच्या अभ्यासाला मदत होण्यासाठी त्यांना स्टायपेंड मिळतो.

सायप्रसचे शिक्षण, क्रीडा आणि युवा मंत्रालय, सायप्रस उच्च आयोग, चेक रिपब्लिकचे दूतावास, डीएएडी, ग्रीसमधील अभ्यास, युनि-इटालिया इंडिया सेंटर आणि इआयटी इनोएनर्जी या सात एजन्सी या मेळ्यात सहभागी आहेत. ते विद्यार्थ्यांना युरोपमध्ये त्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी विविध शिष्यवृत्ती आणि निधीच्या संधी इत्यादींची माहिती गोळा करण्यास मदत करतील.

व्हर्च्युअल फेअर: युरोपियन विद्यापीठांच्या आमनेसामने

ईएचईव्हीएफ भारतातील विद्यार्थ्यांना युरोपमधील विद्यापीठांशी थेट संवाद साधण्याची आणि उत्कृष्ट आणि परवडणाऱ्या, सामन्यांच्या आवाक्यात असणाऱ्या उच्च शिक्षणाच्या शक्यता शोधण्याची अनोखी संधी देते. या दोन दिवसीय फेअर मध्ये वेबिनार आणि लाइव्हचॅट सारख्या अनेक ऍक्टिव्हिटीज असतील, ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, निधी आणि शिष्यवृत्तीच्या संधींबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करतील. विद्यार्थी त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी सहभागी विद्यापीठांमधील माजी विद्यार्थी आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांशी थेट चॅट देखील करू शकतात.

इच्छुक विद्यार्थी स्पष्टता आणि माहिती मिळविण्याची अपेक्षा करू शकतात:

● युरोपियन युनियन, युरोपियन युनियन सदस्य राज्ये, इरॅस्मस+ द्वारे तसेच राष्ट्रीय कार्यक्रम आणि वैयक्तिक विद्यापीठांद्वारे ऑफर केलेल्या शिष्यवृत्तीच्या संधी; शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी पायऱ्या

● युरोपला जाण्यासाठी तयारी कशी करावी

● युरोपियन युनियनमध्ये अभ्यासोत्तर रोजगाराच्या शक्यता

अधिक माहितीसाठी:

● ईएचईव्हीएफ वेबसाइट: https://study-europe.net/

● ईएचईव्हीएफ फेसबुक पेज: https://www.facebook.com/studyeurope.net

● ईयु-इंडिया स्टुडंट मोबिलिटीवर पॉडकास्ट: https://open.spotify.com/episode/2NUzR3A9YWM2rEuNbQAUzr

युरोपियन हायर एज्युकेशन व्हर्च्युअल फेअर (ईएचईव्हीएफ) 2023 मध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी https://study-europe.net/register येथे विनामूल्य नोंदणी करू शकतात.

युरोपियन युनियनबद्दल: 27 देशांचा समावेश असणारी युरोपियन युनियन चीन आणि भारतानंतर जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि तिसरी सर्वात जास्त लोकसंख्या असणारी युनियन आहे. जरी पुष्कळ विविधता असली तरी, युरोपियन युनियन मध्ये असणारे देश (त्याचे ‘सदस्य राज्ये’) सर्व समान मूलभूत मुल्ये: शांतता, लोकशाही, कायद्याचे राज्य आणि मानवी हक्कांचा आदर करण्यासाठी वचनबद्ध आहेत. कोणत्याही परीसीमा नसणारे- अमर्याद मार्केट आणि एकल चलन (युरो) 20 सदस्य राष्ट्रांनी स्वीकारले आहे, युरोपियन युनियन ने व्यापार आणि रोजगाराला महत्त्वपूर्ण चालना दिली आहे.

युरोपियन युनियन -भारताचे संबंध: गरिबी कमी करणे, आपत्ती रोखणे, व्यापाराचा विस्तार करणे, जागतिक मालाची सुरक्षा, जगभरातील सुरक्षा वाढवणे आणि ऊर्जा, आरोग्य, कृषी आणि परस्पर स्वारस्य असणाऱ्या इतर अनेक क्षेत्रात संयुक्त संशोधनाला चालना देण्यासाठी युरोपियन युनियन आणि भारताने 60 वर्षांहून अधिक काळ एकत्र काम केले आहे.

Leave a Reply

%d