शतकांचा ‘किंग कोहली’ च; सचिनाचा विक्रम मोडला
मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये आज पहिला सेमी फायनल सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याचे वनडे क्रिकेटमधील 50 वे शतक ठोकले आहे. यासह त्याने माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची कामगिरी केली.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा पहिला मुकाबला सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत फलंदाजी निवडून न्यूझीलंडला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले. या सामन्यात रोहित शर्मा अर्धशतकाच्या उंबरठयावर असताना त्याची विकेट पडली. परंतु शुभमन गिलने त्याचे अर्धशतक पूर्ण केले, पण याच दरम्यान गिलला दुखापत झाल्याने त्याला मैदाना बाहेर जावं लागलं.
शुभमन गिल मैदानाबाहेर गेल्यावर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी डाव सावरला. यावेळी विराट कोहलीने दमदार शतक ठोकत सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. विराट कोहलीने सेमी फायनल सामन्यात केलेलं हे शतक त्याच पन्नासावं शतक ठरलं असून यासह त्याने भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे.
यापूर्वी सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये 49 शतक ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता, यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज ठरला होता. परंतु आता विराट कोहलीने सचिनच्या रेकॉर्डला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 शतक ठोकण्याचा रेकॉर्ड केला आहे.