fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

‘आप रिश्ते निभाओ, रिवाज तो साथ आ ही जायेंगे’ – Godrej L’Affaire ने भाऊबीजसाठी लाँच केला संदेश

मुंबई : गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड अँड असोसिएट कंपनीज (GILAC)चा Godrej L’Affaire हा मीडिया लाईफस्टाइल प्लॅटफॉर्म असून या प्लॅटफॉर्मने भाऊबीज हा भावंडांचा उत्सव साजरा करण्यासाठी नवा संदेश लाँच केला आहे. भाऊबीजसाठी #CelebratingAcceptance हे डिजिटल कॅम्पेन लाँच करण्यात आले आहे. या लघुपटात भावंडांमधील नातेसंबंधांची वीण गुंफण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याच त्याच पद्धतींना मागे टाकत प्रेमभाव, सर्वसमावेशकता आणि बंधुभाव अशा अनेक गोष्टींचा यात समावेश करून बहिण-भावाच्या नात्यातील अंतरंग फुलविले आहे.

AGENCY09 सोबत गोदरेज कॉर्पोरेट ब्रँड आणि कम्युनिकेशन्स टीमने संकल्पित केलेल्या या चित्रपटात एक ट्रान्सजेंडर स्त्री आणि तिच्या भावाचा भावनिक प्रवास चित्रित करून भावंडाच्या बंधाचा खरा अर्थ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याची सुरुवातच स्वीकार आणि समर्थनाबद्दल संभाषणाने होते. एकच-एक प्रकार आणि पूर्वग्रह कायम असण्याऱ्या जगात या भावस्पर्षी लघुपटाद्वारे पूर्वाग्रहांना आव्हान देण्याचा प्रयत्न Godrej L’Affaire ने केला आहे. या लघुपटात एक ट्रान्सजेंडर महिलेचा भाऊ आणि त्यांची पहिली भाऊबीज साजरी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. लघुपटाची सुरुवात ट्रान्स स्त्रीची आई त्यांच्या घरातील पहिल्या भाऊबीजेसाठी उत्साहात कुटुंबाला जागे करताना होते. ट्रान्स स्त्री सुंदर पारंपारिक पोशाखात तिची खरी ओळख सर्वांना दाखवते. तिच्या सुंदर परिवर्तनामुळे प्रत्येकाला आश्चर्य वाटते. तिचे शेजारी तिला विचारतात, “कशी आहेस मुली?, त्यावर ती उत्तर देते “अखेर मला मी गवसले”. शेजारी आणि तिचे कुटुंब तिची खरी ओळख स्वीकारतात आणि त्यांचा उत्सव सुरू ठेवून चित्रपटाचा समारोप होतो.

ट्रान्स कम्युनिटीमधील प्रणित हत्ते (गंगा)(ती/त ला) या लघुपटात आहे. प्रेम, स्वीकृती आणि सर्वसमावेशक नातेसंबंध समजून घेण्याचे आणि जोपासण्याचे महत्त्व याबद्दल एक संदेश हा लघुपट सुंदरपणे देतो. परंपरांपेक्षा नातेसंबंधांच्या महत्त्वावर जोर देण्याकडे हा लघुपट आपले मन वळवतो. रिवाझो से रिश्ते नही बनते (परंपरांनी नात्यांची वीण बांधली जात नाही), तर त्याऐवजी ‘हम रिश्तो से रिवाझ बनाते है’ (आम्ही नातेसंबंधातून परंपरा निर्माण करतो) असा हृदयस्पर्षी संदेश यातून देण्यात आला आहे. रीतिरिवाजांपेक्षा नातेसंबंधांना प्राधान्य देण्यास आणि स्वीकृती साजरे करण्यास हा लघुपट ग्राहकांना प्रोत्साहित करतो. याची टॅगलाइनही हृदयस्पर्षी संदेश देते : “आप रिश्ते निभाओ, रिवाज तो साथ आ ही जायेंगे!”. (नातेसंबंध जोपासा, परंपरा सोबत येतील).

कितीही पूर्वग्रह असो वा त्याची माहिती होण्यास एखाद्याला कितीही वेळ लागो, याची पर्वा न करता स्वीकृतीच्या दिशेने मार्गक्रमण करा, हे दाखवतानाच हा लघुपट ”कुछ चीजे समझने में देर लगती है, देर से ही सही, आज हम अपनी पहली भाई दूज मना रहें है” यावर जोर देतो आणि आपल्या हळव्या मनाला स्पर्ष करतो. अशा प्रकारे सामाजिक विचारांना आकार देणे आणि स्वीकृती वाढवणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

मोहिमेबद्दल बोलताना गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असोसिएट कंपनीज (GILAC)च्या कॉर्पोरेट ब्रँड आणि कम्युनिकेशन्सचे उपाध्यक्ष आणि प्रमुख सुजित पाटील म्हणाले की, फॉलोअर्सना सामाजिक संदेशातून गुंतवून ठेवण्याचा Godrej L’Affaire चा प्रयत्न असतो. साध्या-साध्या गोष्टींतून आपले आयुष्य कसे समृद्ध होते आणि आपले नातेसंबंध कसे दृढ होतात, हे दाखवतानाच एखादी गोष्ट स्वीकारण्याचा आणि प्रेमभावाचा प्रवास टिपण्याचा प्रयत्न या लघुपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या लघुपटामुळे आपल्या पूर्वग्रहांपासून सुटका होईल आणि नातेसंबंधांमध्ये स्वीकारण्याची संस्कृती रूजेल, अशी आशा आहे.

त्यात आणखी भर घालत गोदरेज डीईआय लॅबचे प्रमुख परमेश शहानी म्हणाले की, गोदरेज इंडस्ट्रीजमध्ये, आम्ही जे काही करतो त्यामध्ये सर्वसमावेशकता आणि विविधतेला प्रोत्साहन देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. सर्वांमध्ये प्रेम साजरे करण्याच्या आमच्या प्रयत्नांना हा उपक्रम अधोरेखित करतो. या मोहिमेद्वारे आम्ही भारतातील नेटिझन्सना प्रथांसोबतच नातेसंबंधांना महत्त्व देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या सर्वसुंदर विविधता सांभाळून प्रेम करण्यास प्रोत्साहित करू, अशी आशा करतो. आपल्या कुटुंबातील सदस्य आणि LGBTQIA समुदायातील मित्रांसह त्यांच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षणांचा उत्सव करण्यासाठी त्यांना हाताशी धरून चालणे आवश्यक आहे.”

लघुपटामागे ज्यांची संकल्पना आणि पटकथा आहे ते AGENCY09 चे सिनिअर कंटेंट क्रिएटर आदी सावंत म्हणाले की, सध्याचा काळ आणि आजच्या दिवसाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. एखाद्या गोष्टीची चांगली बाजू सर्वांसमोर मांडणे हे योग्य दिशेने जाण्यासाठी महत्त्वाचे आहे. स्वत: एक विलक्षण व्यक्तिमत्व असल्याने, यासारख्या स्वीकृती साजरे करणाऱ्या कथेची संकल्पना मांडताना मला गौरवास्पत वाटले.

Leave a Reply

%d