fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

दिवाळीच्या खरेदीसाठी येणाऱ्या पुणेकरांसाठी नुमवि मध्ये पार्किंगची सोय

पुणे : लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता येथे मोठ्या प्रमाणात कापड, सोने – चांदी व साड्यांची भव्य दालने आहेत. पुणे शहरातील ही एक प्रमुख बाजारपेठ आहे. दीपावली हा हिंदूंचा सर्वात महत्वाचा सण असून या सणाच्या कालावधीत खरेदी करणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे या काळात लग्नासाठीचे कपडे, सोने – चांदी, दागिने यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. पुणे शहरातील नागरिकांबरोबरच आजू बाजूच्या शहरांमधून, गावांमधून अनेक कुटुंबे येथे खरेदी साठी येतात. या सर्व ग्राहकांना त्यांची चार चाकी वाहने पार्किंग करण्यासाठी पर्याप्त जागा उपलब्ध नसल्याने सर्वांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

ग्राहकांना त्रास होऊ नये व वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पुणे व्यापारी महासंघातर्फे वर नमूद तिन्ही रस्त्यांवर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या चार चाकी वाहनांसाठी पार्किंगची खास व्यवस्था अप्पा बळवंत चौक येथे असलेल्या नूतन मराठी प्रशाला (बाजीराव रस्ता) या शाळेच्या पटांगणात करण्यात आली आहे. लक्षी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता या तिन्ही रस्त्यांवर खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

नूतन मराठी शाळेच्या पटांगणात करण्यात येत असलेली ही विशेष पार्किंग व्यवस्था दिनांक १० व ११ नोव्हेंबर २०२३ असे दोन दिवस सकाळी १० ते रात्री ८ अशी असेल.

ग्राहकांची चार चाकी वाहने पार्क करताना योग्य रीतीने पार्क करावीत व वाहने काढताना कोणास त्रास होणार नाही याची कृपया काळजी घ्यावी.

Leave a Reply

%d