भेकराईनगर योग सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी पहाट
पुणे :भेकराईनगर योग सामाजिक संस्थेच्या वतीने आज गुरुवार दिनांक 09/11/2023 रोजी पहाटे 5.30 ला योग मंदीर, तुकाई टेकडी, भेकराईनगर येथे दिवाळी पहाट चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भोपाळी, अभंग, भावगीत तसेच भावगीतांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी 150 हून अधिक योग साधक उपस्थित होते.
या कार्यक्रमात गायक श्री शिवकुमार मठपती, श्री शाहुराज माने, सौ मनीषा गायकवाड, श्री योगेश माळी तसेच कालकुंद्रेजी व ससानेजी, सौ गावडे ताई यांनी सादरीकरण केले व हा कार्यक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती श्रीयुत आबा तुपे, श्री संजय हरपळे, श्री अजिंक्य ढमाळ,श्री सुरवसेजी, श्री सुर्यवंशीजी, योगगुरू श्री भांबरे सर, श्री भामे सर यांची होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मुख्य योग शिक्षक श्री सखाराम मांढरे सर, श्री संजय ढोक, राजु आहेरकर, श्री रोकडे काका. श्री अर्जुन चौधरी यांनी प्रयत्न केले.