Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीकरीता सायकल फेरीचे आयोजन

पुणे : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात मतदार नोंदणी जनजागृतीकरीता ‘पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ (स्वीप) कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणी सायकल फेरीचे आयोजन करून नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात युवकांनी या सायकल फेरीत सहभाग घेऊन मतदार नोंदणीचे आवाहन केले. काही ठिकाणी पात्र व्यक्तींकडून मतदार नोंदणीसाठी नमुना ६ चा अर्ज भरून घेण्यात आला. आज आयोजित सायकल फेरीच्यावेळी २६० नवमतदारांची नोंदणीदेखील करण्यात आली.

जिल्ह्यातील १८ ठिकाणी अशा फेरीचे आयोजन करण्यात आले असून इतरही ठिकाणी मतदार जागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती स्वीप समन्वयक उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading