बँक ऑफ इंडियाचा या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा १, ४५८ कोटी रु., वार्षिक नफ्यात 52% वाढ
पुणे : बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १, ४५८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑपरेटिंग नफ्यात ९६० कोटींची भर पडून 11% नी वार्षिक सुधारणा झाली. यामुळे यंदाच्या वर्षी हा नफा ३ हजार ७५६ कोटी झाला आहे. गेल्या वर्षी हा नफा ३ हजार ३७४ कोटी रु. एवढा होता.
निव्वळ व्याज उत्पन्न (NII) हे वार्षिक 13% या दराने सुधारले आहे. आणि या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत हा नफा ५ हजार ७४० कोटी एवढा होता. जो गेल्या वर्षी याच काळासाठी ५ हजार ०८३ कोटी एवढे होते. तर गैर-व्याज उत्पन्न वार्षिक 19% नी सुधारले आणि या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ते १ हजार ६८८ कोटींवर आले. गेल्या वर्षी याच काळात हे उत्पादन १ हजार ४१७ कोटी एवढे होते.
NIM (ग्लोबल) हे गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 3.04% एवढे होते. तो यंदा 4 पॉइंट्सने वाढून 3.08% वर गेला. जागतिक व्यवसाय वार्षिक 9.25% ने वाढला आहे. सप्टेंबर 22 मध्ये हा व्यवसाय 11 लाख 41 हजार 356 कोटींवर होता, तो यंदा १२ लाख 46 हजार 879 कोटी रुपयांवर गेला आहे. देशांतर्गत ठेवीत देखील वाढ झाली असून ही वाढ 8.61% एवढी आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये या ठेवी ५,५१,४०१ कोटी एवढ्या होत्या त्या सप्टेंबर २३ मध्ये ५ लाख ९८ हजार ८५० कोटी रुपये एवढ्या झाल्या आहेत.
जून 23 मधील सकल NPA ३४ हजार ५८२ कोटींवरून सप्टेंबर २३ मध्ये 31 हजार 719 कोटी रुपयांवर आले आहे. ही घट 8.28% आहे. तर प्रोव्हिजन कव्हरेज रेशो (पीसीआर) जून 23 मध्ये 89.52% होता, तो सप्टेंबर’23 मध्ये 89.58% इतका झाला आहे. तर भांडवली पर्याप्ततेच्या आघाडीवर ३० सप्टेंबर रोजी बँकेचे एकूण भांडवली पर्याप्तता प्रमाण (CRAR) 15.63% होते. हेच प्रमाण जून महिन्यात 15.60% एवढे होते.
बँकेने डिजिटल उत्पादने तयार केली आहेत, उदा. बँक बचत खाती आणि कर्ज विभागावर मुद्रा/केसीसी/वैयक्तिक कर्ज/पेन्शनर कर्ज. ग्राहक आता बचत खाती उघडू शकतात आणि शाखेत प्रत्यक्ष भेट न देता कर्ज मिळवू शकतात. येत्या काही महिन्यांत (या वर्षाची तिसरी आणि चौथी तिमाही) बँकेची 15 हून अधिक अतिरिक्त डिजिटल उत्पादने लॉन्च करण्याची योजना आहे. आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत डिजिटल उत्पादनांच्या माध्यमातून कमीत कमी १० हजार कोटी रुपयांचे व्यावसायिक परिमाण गाठण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे.
30 सप्टेंबर’23 पर्यंत, बँकेच्या देशांतर्गत शाखांची संख्या 5135 आहे.
