Monday, August 31, 2026
BusinessLatest News

‘कॅम्पस अॅक्टिव्हवेअर’तर्फे पुण्यात दोन खास रिटेल स्टोअर्सचे उद्घाटन

पुणे : कॅम्पस अॅक्‍टिव्हवेअ या भारतातील अग्रगण्य स्पोर्ट्स आणि अॅथलीझर फुटवेअर ब्रँडने पुण्यात आंबेगाव आणि एरोमॉल येथे दोन खास रिटेल स्टोअर्स सुरू केली आहेत. आंबेगाव येथे १०९२ चौरस फूट जागेत व्यापलेले दुकान २.२ ए, अॅस्टन प्लाझाआंबेगाव बुद्रूकपुणे ४६ येथे आहे. लोहगावमध्ये विमानतळाच्या परिसरातील रोमॉलच्या पहिल्या मजल्यावर स्थित दुकान ५१५ चौरस फूट जागेवर उभे आहे. या दोन्ही स्टोअर्समध्ये उच्च गुणवत्तेचीफॅशनेबल आणि रास्त दरातील पादत्राणांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. कॅम्पस ब्रँडच्या वाढीच्या प्रवासाचा एक भाग म्हणून ही स्टोअर्स उघडण्यात आली असून फॅशन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण डिझाईन्स बाजारात सादर करणे व या संदर्भात ग्राहकांच्या मागण्यांची दखल घेणे हा या ब्रॅंडचा उद्देश आहे.

नव्याने उघडण्यात आलेल्या या आउटलेट्समध्ये कॅम्पस अॅक्टिव्हवेअरच्या खूप मागणी असलेल्या ओजीनायट्रो फ्लाय आणि नायट्रो बूस्ट अशा श्रेणी मांडण्यात आल्या आहेत. ग्राहकांना या ठिकाणी खरेदीचा अत्यंत सुखद अनुभव मिळेल. आपल्या अॅथलेटिक्समधील गरजा आणि फॅशनमधील प्राधान्ये पूर्ण करणाऱे विविध पर्याय ग्राहकांना येथे मिळू शकतात. या आउटलेट्समध्ये प्रत्येकासाठी काहीतरी उपलब्ध आहे. या स्टोअर्सचा उद्घाटन सोहळा साजरा करण्याच्या निमित्ताने कॅम्पस अॅक्टिव्हवेअरतर्फे ३,४९९ रुपये आणि त्याहून अधिक खर्च करणाऱ्या ग्राहकांना स्टायलिश बॅकपॅक अगदी मोफत देण्यात येत आहे. ग्राहकांना अधिक मूल्य देण्यास कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेअर समर्पित आहेहे यातून प्रतिबिंबित होते. ग्राहकांनाही हा फरक प्रत्यक्षपणे जाणवतो.

या प्रसंगी बोलताना कॅम्पस अॅक्टिव्हवेअर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल अग्रवाल म्हणाले, “पुण्यात आमची दोन नवीन खास आउटलेट्स सादर होत आहेत, याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. गुणवत्तास्टाईल आणि परवडणारी किंमत या गोष्टींचे मिश्रण असणारी पादत्राणे ग्राहकांना देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या नवीन दुकानांमध्ये खरेदीचा उत्कृष्ट अनुभवचांगली मांडणी, परवडणाऱ्या किंमती यांचा अनुभव ग्राहकांना मिळणार आहे. कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेअरमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसोबत पावले टाकून त्यांच्या फॅशनच्या गरजा समजून घेतो आणि स्टाईलआत्मविश्वास व अभिव्यक्तीमध्ये क्रांती घडवून आणण्याकरीता आमच्यात सामील होण्यासाठी प्रत्येकाला प्रोत्साहित करतो. आमचा हा प्रवास अक्षय ऊर्जेने भारलेला आहे. ग्राहकांचा विश्वास व पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे आणि त्यांकरीता आम्ही त्यांचे आभार मानतो.”

कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेअर हा ब्रँड भविष्याची वाटचाल करीत आहे.  ग्राहकांच्या स्टाईलचे मूल्य वाढविण्यावर भर देऊनप्रत्येक प्रसंग जिंकून आणि तरुणाईला प्रेरीत करून तो आपल्या वाढत्या बाजारपेठेत उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करीत आहे. कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेअरची सध्या भारतभरात २०० स्टोअर्स आहेत आणि त्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे या ब्रॅंडची उत्पादने सर्वत्र सहज मिळत आहेत. त्यांत घट होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. भारतातील सर्वाधिक पसंतीचा अॅथलीझर ब्रॅंड अशी ख्याती मिळविण्याचे या ब्रॅंडचे ध्येय आहे. त्याकरीता डिझाईन आणि उत्पादनातील नाविन्यता यांच्यावर कंपनीचे लक्ष केंद्रित आहे.

ग्राहक आणि भागधारकांच्या सहकार्यामुळे कॅम्पसची उत्पादनेगुणवत्ता आणि डिझाइन अनेक शहरांमध्येगावांमध्ये लोकप्रिय होऊ लागली आहेत. आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्तीला चालना देणे आणि तरुणांमध्ये पादत्राणांविषयी जागरुकता वाढवणे हे काळाच्या ओघात विकसित होत असलेल्या कॅम्पसचे उद्दिष्ट आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading