लक्ष्मी रस्त्यावरील विद्युत रोषणाईचे औपचारिक उद्घाटन
पुणे : आज लक्ष्मी रस्त्यावरील विद्युत रोषणाईचे औपचारिक उद्घाटन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते झाले लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स जवळ झाले.
लक्ष्मी रस्त्यावरील विद्युत रोषणाईचे औपचारिक उद्घाटन करताना पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की पुणे शहरात शॉपिंग साठी लक्षी रोड महत्वाचे ठिकाण आहे. फक्त पुण्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून ग्राहक लक्ष्मी रोडला खरेदी साठी येतात आणि आज नाही तर १९२२ पासून येतात. लक्ष्मी रस्त्याचे नामकरण होऊन १०१ वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने येथील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येवून छान विद्युत रोषणाई केली आहे. १०१ वर्ष झाल्याचे औचित्य आणि दिवाळीचा सण या दोन्हींमुळे ही रोषणाई विशेष आकर्षण ठरत आहे.
यावेळी बोलताना पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका म्हणाले, ” इंग्रजांच्या काळात लक्ष्मी रस्त्याची इस्ट – वेस्ट रोड अशी नोंद आढळते. या रस्त्यावर पुण्यातील कापड व्यापाऱ्यांची व सराफांची मोठी दालने आहेत. पुणे शहराबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमधून देखील ग्राहक लक्ष्मी रस्त्यावर खरेदी साठी येतात. कोरोनामुळे गेल्या वर्षी १०० वर्ष पूर्ण झाल्याचे आम्ही साजरे करून शकलो नाही. परंतु आता १०१ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत आम्ही सुमारे ३ किलोमीटर लांब इतकी विद्युत रोषणाई लक्षी रस्ता, कुमठेकर रस्ता व बाजीराव रस्ता या तीन प्रमुख रस्त्यावर केली आहे. पुणेकरांनी आवर्जून ही रोषणाई पाहायला भेट द्यावी.”
लक्ष्मी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सराफांची दुकाने असल्याने वॉकींग प्लाझा करू नये. बरेच लोक आज देखील खरेदीसाठी येताना रोख रक्कम आणतात त्यामुळे वॉकींग प्लाझा केल्यास जोखीम घेऊन कोणी शॉपिंगला येणार नाही. त्याशिवाय पे अँड पार्क करावा. तसेच फुटपाथ वरील फेरीवाल्यांची इतर काही सोय करावी आणि १९९२ – ९३ साला पर्यंत असलेली वाहतुकीची पद्धत ज्यामध्ये डेक्कन वरून लक्ष्मी रस्त्यावर येता येत होते ती पुन्हा सुरु करावी अशा काही मागण्या रांका यांनी यावेळी महापालिका आयुक्तांकडे यावेळी केल्या.
