Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्राची माफी मागावी… – संभाजी ब्रिगेड

पुणे : रामदास स्वामी मुळेच छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले… हे उद्गार केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान  यांचे आहे. छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व महान आहे इतिहासामध्ये कधीही छत्रपती शिवरायांच्या आणि रामदास स्वामींची भेट झालेली नाही असा कुठेही संदर्भ नाही असं असताना जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून रामदास स्वामींना थोपवण्याचा हा हलकट प्रयत्न काही तथाकथित लोकांकडून केला जात आहे. भाजपने पाळलेले आणि सोडलेले हे वाचाळवीर जाणीवपूर्वक खोटा इतिहास सांगत आहेत, हे निषेधार्ह आहे. केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रसाद महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी केली आहे. 

आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहे. त्यांचा अवमान आम्ही कदापिही सहन करणार नाही. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने त्यांना उत्तर दिले जाईल. असा इशारा शिंदे यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading