Saturday, April 4, 2026
BusinessLatest NewsLIFESTYLE

Vyb बाय फास्ट्रॅक: युवा महिलांसाठी नवा पार्टी वेयर वॉच ब्रॅण्ड

भारतातील आयकॉनिक युथ ब्रॅण्ड म्हणून नावाजल्या जाणाऱ्या फास्ट्रॅकने युवा महिलांसाठी Vyb हा खास सब-ब्रॅण्ड नुकताच सादर केला आहे. अतिशय सुंदर, स्टायलिश व खूपच अनोखा Vyb ब्रॅण्ड खास फॅशनीस्टांसाठी बनवण्यात आला आहे ज्यांना नवनवीन ट्रेंड्स व डिझाइन्सचा आनंद घ्यायला खूप आवडते. सध्याच्या फास्ट-फॅशनच्या काळात सर्व प्रकारच्या पार्ट्यांमध्ये आपला ग्लॅम-कोशंट कायम वाढत रहावा यासाठी आकर्षक घड्याळे ज्यांना हवी असतात अशा महिलांची आवड Vyb बाय फास्ट्रॅकमध्ये नक्की पूर्ण होईल. या कलेक्शनमध्ये सुरुवातीला तब्बल ७१ डिझाइन्स सादर करण्यात आली असून ती सर्वच्या सर्व पाहताक्षणी नजर खिळवून ठेवतील अशी आहेत. अतिशय अनोखे आणि सुशोभित स्ट्रॅप्स, नवीन प्लेटिंग रंग आणि आगळेवेगळे डायल शेप्स यामुळे या कलेक्शनमधील प्रत्येक घड्याळ प्रत्येक मूड व प्रत्येक प्रसंगासाठी साजेसे ठरेल असे बनले आहे. इतकेच नव्हे तर, या घड्याळांच्या किमती देखील सहज परवडण्याजोग्या १२५० रुपयांपासून २९६० रुपयांपर्यंत ठेवण्यात आल्या आहेत.

Vybमुळे आता फास्ट्रॅकच्या पोर्टफोलिओमध्ये नवीन डिझाइन्सची भर पडली आहे, अशी डिझाइन्स ज्यामध्ये फॅशन-फॉरवर्ड युवा महिलांसाठी ब्लिंगचा स्पर्श देण्यात आला आहे, कोणत्याही पार्टीमध्ये अतिशय मोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने वावरण्यासाठी प्रोत्साहन देणारी अशी ही डिझाइन्स आहेत. या ब्रॅण्डची टॅगलाईन “Vyb On” मध्ये ही सर्व वैशिष्ट्ये चपखलपणे सामावली आहेत.

फास्ट्रॅकचे मार्केटिंग हेड अजय मौर्य यांनी सब-ब्रॅण्डच्या लॉन्चबाबत सांगितले, “युवा महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्यांमध्ये वापरता येतील अशा घड्याळांचा सब ब्रॅण्ड Vyb सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रसंग कोणताही असो त्यासाठी नेहमीच ग्लॅम रेडी राहता यावे, वेगवेगळ्या प्रकारचे लूक्स अगदी सहजपणे मिरवता यावेत ही Vyb ब्रॅण्डची प्रमुख संकल्पना आहे. Vyb वॉचेस अनोखी फॅशन स्टेटमेंट्स आहेत. आमच्या ग्राहकांना Vybसोबत Vyb On झालेले पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत!”

देशभरातील सर्व फास्ट्रॅक आणि टायटन वर्ल्ड स्टोर्समध्ये, तसेच मल्टी-ब्रॅण्ड दुकानांमध्ये Vyb वॉचेस खरेदी करता येतील. ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर फास्ट्रॅकच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि फ्लिपकार्टवर Vyb बाय फास्ट्रॅक उपलब्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading