Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

पुस्तकांसह माणसं आणि परिस्थितीही वाचायला शिका- डॉ. सदानंद मोरे

पुणे  – केवळ पुस्तक वाचून पुस्तकी किडा होऊ नका, तर पुस्तकांसह माणसं आणि परिस्थितीही वाचायला शिका, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिना’ निमित्त आयोजित ‘मी एक वाचक’ या कार्यक्रमात बोलत होते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून गुरूवारी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

विविध विषयातील वाचन केल्यामुळे आपल्या ज्ञानाची क्षितिजे रुंदावतात, आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, असे डॉ. सदानंद मोरे यावेळी म्हणाले. तसेच सध्या वाचनासाठी ग्रंथालयांव्यतीरिक्तही अनेक पर्याय आले आहेत, त्यामुळे वाचनावर मर्यादा आणू नका, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. यावेळी त्यांनी वाचक ते लेखक हा त्यांचा प्रवासही उलडगला. जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात आयोजित या कार्यक्रमात तत्वज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. श्रीधर आकाशकर, प्रा. हरिष नवले उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या प्रभारी संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र यांनी केले. तर डॉ. रजनी मेश्राम यांनी सुत्रसंचालन आणि डॉ. प्रियंका वाडेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading