एल अॅण्ड टी होल्डींग्ज ने वित्तीय वर्ष २०२३ -२४ च्या दुसऱ्या तिमाहीत ५९५ कोटी रुपयांचा एकत्रित करोत्तर नफा
पुणे : देशातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक असलेल्या आणि अतिशय झपाट्याने ग्राहककेंद्रीत, उच्च दर्जा, डिजीटल तंत्रज्ञानाने परिपूर्ण रिटेल एनबीएफसीकडे आपला प्रवास करणाऱ्या एल अॅण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेड (एलटीएफएच) ने ३० सप्टेंबर २०२३ अखेरच्या दुसऱ्या तिमाहीत ५९५ कोटी रुपयांचा एकत्रित करोत्तर नफा (पॅट) नोंदविला आहे. गतवर्षातील दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदा या नफ्यात ४६ टक्के वाढ झाली आहे.
एकूण कर्ज वाटपात कंपनीने रिटेल कर्ज पोर्टफोलिओचे प्रमाण ८८ टक्क्यांवर नेले असून लक्ष्य २०२६ मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या ८० टक्के रिटेल कर्जाच्या उद्दीष्टापेक्षा हे प्रमाण अधिक आहे. कंपनीने तीन वर्षां आधीच लक्ष्य २०२६ मधील बहुतांश उद्दीष्टे साध्य केली आहेत.
वित्तीय वर्ष २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत शुभारंभ करण्यात आलेले कंपनीचे ग्राहकाभिमुख अॅप्लिकेशन-प्लॅनेट अॅप ग्राहक वर्गासाठी सक्षम डिजीटल चॅनेल म्हणून उत्तम पर्याय ठरला असून या अॅपने ६० लाख डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे.
३० सप्टेंबर २०२३ अखेरच्या दुसऱ्या तिमाहीतील रिटेल कर्जवितरण १३ हजार ४९९ कोटी रुपयांवर पोहचले असून वार्षिक तिमाहीच्या तुलनेत त्यात ३२ टक्के वाढ झाली आहे. एलटीएफएचची स्थापना झाल्यापासून यंदाच्या तिमाहीतील कर्जवितरण हे उच्चांकी रिटेल कर्जवितरण ठरले आहे. रिटेलमधील सर्व प्रकारातील कर्जाच्या मागणीत जोरदार वाढ, हे त्यामागील प्रमुख कारण आहे. एकूण रिटेल कर्जवाटपाची रक्कम आता ६९ हजार ४१७ कोटी रुपयांवर झेपावली असून ३० सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीच्या तुलनेत त्यात
३३ टक्के वाढ झाली आहे.
यंदाच्या तिमाहीतही एलटीएफएचने घाऊक कर्जाच्या (होलसेल) प्रमाणात झपाट्याने कपातीचे धोरण कायम ठेवले आहे. लक्ष्य २०२६ मधील उद्दीष्टांनुसार होलसेल कर्जाच्या प्रमाणात गत वर्षातील तिमाहीच्या तुलनेत ७६ टक्के कपात होऊन ते ३८ हजार ५८ कोटींवरुन १ हजार ३१८ कोटी रुपयांवर आले आहे. त्यामुळे एलटीएफएचचे रिटेल फिनटेक स्केल अर्थात बड्या रिटेल फिनटेक कंपनीत रुपांतर झाले आहे.
एल अॅण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दिनानाथ दुभाषी म्हणाले, की
आगामी काळात ग्राहकांच्या संख्येत अधिकाधिक भर घालणे, क्रेडिट अंडररायटिंगमध्ये वाढ करणे, भविष्यकालीन डिजिटल आराखड्याची अंमलबजावणी, ब्रँडची दृश्यमानता वाढविणे आणि कंपनीची क्षमता वाढवणे या ५ प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित करताना शाश्वतपणे ‘लक्ष्य’ मधील उद्दीष्ट्ये साध्य करण्यावर आम्ही नजर कायम केंद्रित ठेवू. एलटीएफएचमध्ये, आमचा ठाम विश्वास आहे की रिटेल विभागामध्ये आशादायक संधी आहेत आणि आम्ही आमचा बँकींग उत्पादन पोर्टफोलिओ, ग्राहकांशी संपर्क, क्षमताविस्तार यांत वाढीबरोबरच व्यवसाय करताना डेटा अॅनालिटिक्सचा वापर करून सतत वृध्दी करत प्रगती पथावर मार्गक्रमण करत राहू. आम्ही आमची वाढीची गती कायम ठेवू आणि ग्राहक-केंद्रित आणि शाश्वत फिनटेक@स्केल तयार करण्याच्या दिशेने काम करत राहू.आमच्या डिजिटल सुविधांव्दारे ग्राहक अर्थप्रणालीतील प्रत्येक भागाला स्पर्श करताना ग्राहकांकरिता मूल्य प्रस्ताव म्हणून कंपनी डिजिटल पातळीवर वित्तीयसेवांचा पुरवठा विकसित करत राहील.
