हलाल नावाच्या भयावह संकटाची हिंदूंना जाणीव करून देणे आवश्यक – हरींदर सीक्का
पुणे : हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व इस्लाम संस्था संघटनाच्या द्वारे भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. इस्लामिक पद्धत हिंदू बहुल भारतावर लागू करायचे असा हेतू यामागे आहे. हलाल नावाच्या या भयावह संकटाची सर्व बिगर इस्लामी व्यक्तींना विशेषतः हिंदूंना जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्याकरिता जनजागरण हाच एक मार्ग आहे. यासाठी हलाल नियंत्रण मंच, पुणे ची स्थापना करण्यात आली आहे. (Hindus need to be made aware of the dire menace called Halal – Harinder Sikka)
हलाल नियंत्रण मंचाचे अखिल भारतीय प्रमुख हरिंदर सीक्का हे दोन दिवस मंचाच्या विविध कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मच्छिंद्र साठे व सिद्धेश कांबळे व हलाल मंचाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हरिंदर सीक्का म्हणाले, मांस निर्यात करता हलाल प्रमाणपत्र हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. वस्तुतः इस्लामी देशांनाच हलाल मांसाची आयात करणे गरजेचे असते. भारत देशातून क्र. १ ची मांस निर्यात ही व्हिएतनाम तर क्र. २ ची निर्यात थायलंड या देशात होते. परंतु हे दोन्ही देश इस्लामी नाहीत. ही बाब हिंदू संघटनांनी सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्या देशांमध्ये निर्यातीसाठी हलाल प्रमाणपत्राची अट सरकारने काढून टाकलेली आहे. मात्र मुस्लिम देश हे कोणतीही वस्तू आयात करताना, त्यावर हलाल प्रमाणपत्र असेल तरच ती वस्तू आयतीस परवानगी दिली जाते. त्या आयात वस्तूंमध्ये मासांच्या बरोबरच इतर सर्व बाबी चॉकलेट, बिस्किटे, तेल, सौंदर्यप्रसाधने, औषधे आयात केली जातात.
भारतामध्ये हलाल प्रमाणपत्र देण्याचे काम जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट, हलाल कौन्सिल ऑफ इंडिया, जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र, हलाल इंडिया प्रा. लि., ग्लोबल इस्लामिक शरिया सर्व्हिसेस, हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. या संस्था करतात. हलाल प्रमाणपत्र नोंदणी करिता रुपये ६० हजार रुपये घेतात. तर नूतणीकरिता २० हजार रुपये अधिक प्रत्येक उत्पादनामागे रुपये १ हजार अशी फी घेतात. यापैकी जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट ही संस्था बॉम्ब स्फोटातील आरोपींना/आतंकवाद्यांना न्यायालीन खटल्यात मदत करते. म्हणजेच हलाल प्रमाण पत्राच्या माध्यमातून मिळणारे धन हे भारतामध्ये देशद्रोही कारवाया करणाऱ्या लोकांच्या मदतीकरिता वापरले जाते. हे सिद्ध झालेले आहे.
