Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

एनएसईने १६ ऑक्टोबर रोजी १३ नवीन कमोडिटी डेरिव्हेटीव्ज करार बाजारात आणले

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) ला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, एनएसईने १६ ऑक्टोबर २०२३ रोजी १३ नवीन कमोडिटी डेरिव्हेटीव्ज करार बाजारात आणले आहेत. हे नवीन करार बाजारात आणल्यानंतर आता एनएसईच्या  कमोडिटी डेरिव्हेटीव्ज विभागामध्ये एकूण २८ उत्पादने आहेत.

या १३ नवीन कमोडिटी डेरिव्हेटीव्ज करारांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

·        सोने (गोल्ड) १ किग्रॅ फ्युचर्स, सोने (गोल्ड) मिनी फ्युचर्स, चांदी (सिल्वर) मिनी फ्युचर्स, तांबे (कॉपर) फ्युचर्स  आणि झिंक फ्युचर्स यांवर ‘ऑप्शन्स ऑन फ्युचर्स’

·        सोने (गोल्ड) गिनी (८ ग्रॅम) फ्युचर्स, अॅल्युमिनियम फ्युचर्स, अॅल्युमिनियम मिनी फ्युचर्स, शिसे (लीड) फ्युचर्स, शिसे (लीड) मिनी फ्युचर्स, निकेल फ्युचर्स, झिंक फ्युचर्स आणि झिंक मिनी फ्युचर्स

गेल्या काही दिवसात एनएसईने ६ नवीन  डेरिव्हेटीव्ज करार बाजारात आणले होते:

·        डब्ल्यूटीआय कच्चे तेल (क्रूड ऑइल) – मिनी फ्युचर्स आणि ‘ऑप्शन्स ऑन फ्युचर्स’ करार

·        नैसर्गिक वायू –  मिनी फ्युचर्स आणि ‘ऑप्शन्स ऑन फ्युचर्स’ करार

·        चांदी- मिनी फ्युचर्स आणि मायक्रो फ्युचर्स करार

एक्सचेंजकडे या आधीपासून सोने (गोल्ड) १ किग्रॅ फ्युचर्स, सोने (गोल्ड) मिनी फ्युचर्स, सोने (गोल्ड) पेटल फ्युचर्स (१ ग्रॅम), चांदी (सिल्वर) ३० किग्रॅ फ्युचर्स, चांदी (सिल्वर) ३० किग्रॅ ‘ऑप्शन्स ऑन गुड्स’, डब्ल्यूटीआय कच्चे तेल (क्रूड ऑइल) फ्युचर्स, नैसर्गिक वायू फ्युचर्स, ब्रेन्ट कच्चे तेल (क्रूड ऑइल) फ्युचर्स, तांबे (कॉपर) फ्युचर्स यांचे कमोडिटी करार आहेत. 

     एक्सचेंजच्या पाहण्यात आले आहे की, एक्सचेंजने नवीन उत्पादने, विशेषतः डब्ल्यूटीआय कच्चे तेल (क्रूड ऑइल) आणि नैसर्गिक वायूवर डेरिव्हेटीव्ज, बाजारात आणल्यापासून त्यांच्या कमोडिटी डेरिव्हेटीव्ज विभागामध्ये भागीदारांचे स्वारस्य विशेष वाढले आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) आणि देशांतर्गत म्युच्युअल फंड यांच्यासह वेगवेगळ्या विभागांमधून सहभागींचा सहभाग दिसून आला आहे.  

     नवीन ट्रेडिंग सदस्यांना एक्सचेंजमध्ये सहभागी होणे सोपे जावे, विद्यमान सदस्यांना विभागीय सक्षमता मिळावी आणि काम करताना सहज व सोपा अनुभव देणाऱ्या  अल्गोरीदमिक ट्रेडिंगसारख्या अन्य कामकाजांच्या प्रक्रियांसाठी एक्सचेंजने समर्पित टीम्स  तयार केल्या आहेत.

एनएसईचे मुख्य व्यापार विकास अधिकारी श्रीराम कृष्णन म्हणाले, “एनएसईमधील कमोडीटी डेरिव्हेटिव्ह विभागामधील आमच्या उत्पादनांचा विस्तार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आज आम्ही १३ नवीन उत्पादने बाजारात आणल्यामुळे एनएसई व्यासपीठावर ऊर्जा आणि बुलिअन व बेस धातू श्रेणीतील सर्व प्रमुख उत्पादनांवर फ्यूचर्स आणि ऑप्शन्स उपलब्ध आहेत. यामुळे सहभागींना एक्सचेंज व्यासपीठावर सर्व वस्तूंमध्ये (कमोडिटी) आपल्या जोखि‍मेला कुशलतेने व्यवस्थापित करण्यास मदत मिळेल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading