Saturday, October 17, 2026
Latest NewsPUNE

आशा ताईंचा सदाबहार गाण्यांच्यी मैफल

पुणे : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त यंदाच्या वर्षी पुणे नवरात्रौ महोत्सवात ‘स्वीट 90 आशा‘ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. ‘निवेदिता प्रतिष्ठान‘ तर्फे अॅड. अनुराधा भारती यांची संकल्पना व निवेदन होते.

गीतांजली जेथे, अजय राव व राजू जाधव यांनी सुंदर गाणी सादर केली व त्यांना साथ संगत पोर्णिमा गीते, रोहिणी काळे, अनघा निमगावकर, किशोरी तांबोळी व शर्मिला जुस्ती यांनी केली. तसेच पुण्यातील नामवंत वाद्यवृंद ज्यामध्ये रशीद शेख व अमन सय्यद (रिदम मशीन), कांचन निंबाळकर (गिटार), स्वयम सोनवणे (ड्रम किट), रोहित साने (तबला व ढोलक), नंदू द्रविड (रिदम मशीन), मिलिंद महाजन (बोंगो) व इंटरनॅशनल ख्यातीचे नामवंत सेक्सोफोन प्लेयर महेंद्र कुमार कांबळे (सेक्सोफोन) यांनी साथ देऊन अतिशय शानदार असे कार्यक्रमाचे सादरीकरण केले.   

  पडदा उघडल्या उघडल्या टाळ्यांच्या कडकडाटात आशाताईंच्या ‘परदे मे रहने दो‘, या गाण्यापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली.‌ देवी मातेला वंदन करून जय शारदे वागेश्वरी या मराठी भक्ती गीतानंतर आशाताईंची सर्व एव्हरग्रीन गाणी जशी आईये मेहरबान, ये है रेशमी जुल्फों का अंधेरा, रात अकेली है, आओ हुजूर तुमको, दम मारो दम, पिया तू अब तो आजा, जब छाये मेरा जादू, रात बाकी बात बाकी, जवानी जानेमन, जाइये आप कहा, मेरे सोना रे सोना रे, झुमका गिरा रे अशी उडत्या चालीची गाणी सादर केली.

तसेच रफी साहेबांबरोबरचे आशाताईंचे द्वंदगीतं जशी दिवाना हुआ बादल, इशारो इशारो मे, अभी ना जाओ छोडकर, आजा आजा मै हू प्यार तेरा, ओ हसीना जुल्फो वाली अशी दमदार गीतं तर बडे है दिल के व हाय रे हाय ये मेरे हाथमे तेरा साथ अशी शम्मी कपूर यांच्या वरती चित्रीत झालेली भांगडा गीत सादर केली. तसेच किशोर कुमार यांच्याबरोबरची त्यांनी गायलेली ये राते ये मौसम,  छोड दो आचल, आँखो में क्या जी, अरे यार मेरी तुम भी हो गजब, हाल कैसा है जनाब का अशी हलकीफुलकी गीतं तर निषा आहाहा, आज रपट जाये, आपके कमरे में कोई  रहता है अशी एकापेक्षा एक सदाबहार हिंदी गीतं सादर केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading