Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

अधिपती आणि अक्षराच्या संसारला सुरवात होणार ….

झी मराठी वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह प्रेक्षकांनी अनुभवला. दोघांच्या  लग्नामध्ये आणि लग्नानंतर अनेक अडचणी येताना दिसत आहेत. अशातच अक्षरा अधिपती दोघं जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जाणार आहेत. 

या मालिकेच्या नवीन भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर आऊट झाला. त्यामध्ये अधिपती अक्षराला उचलून घेत जेजुरीचा गड चढताना दिसत आहे. या मालिकेच्या शूटिंगसाठी हे कलाकार खरोखरच जेजुरीला गेले होते. तेथील खंडोबाच्या देवळातील एक फोटो शिवानीने शेअर केला. त्या फोटोमध्ये शिवानी पारंपारिक वेशभूषेत दिसत असून तिने कपाळावर भंडारा लावला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “येळकोट येळकोट जय मल्हार!

तेव्हा पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ जेजुरी विशेष भाग बुधवार १८ ऑक्टोबर रात्री ८ वा.  फक्त आपल्या झी मराठीवर.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading