Friday, October 16, 2026
Latest NewsLIFESTYLEPUNE

पुण्यामध्ये दर ५ पैकी १ व्यक्ती पीसीओडी, उच्च कोलेस्टेरॉल आणि स्थूलपणा या समस्यांनी ग्रस्त आहे

पुणे:पुण्यामध्ये हल्लीच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, शहरातील दर ५ पैकी १ व्यक्तीला उच्च कोलेस्टेरॉल आणि स्थूलपणा हे बैठ्या जीवनशैलीमुळे होणारे त्रास आहेत. प्रजननक्षम वयोगटातील दर ५ पैकी १ महिलेला पॉलिसिस्टिक ओव्हरीयन डिसऑर्डरचा त्रास असल्याचे दिसून आले आहे. उच्च कोलेस्टेरॉल, स्थूलपणा आणि पीसीओडी ही पुणे शहरातील स्त्री पुरुषांमधील वंध्यत्वाची प्रमुख कारणे आहेत आणि लवकरात लवकर निदान व उपचार करून त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

पीसीओडी, उच्च कोलेस्टेरॉल आणि स्थूलपणा यांच्या बरोबरीनेच ऍनिमिया व थायरॉईड या आजारांमध्ये देखील वाढ होत असून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील ३०% महिलांना हे त्रास आहेत असे देखील या संशोधनात आढळून आले आहे. हे संशोधन पुणे शहरातील इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल्सनी केले आहे.  गेल्या दहा वर्षात या हॉस्पिटल्समध्ये २६००० केसेसवर उपचार करण्यात आले आहेत. शहरातील या आकडेवारीचे गांभीर्य लक्षात घेता, इंदिरा आयव्हीएफ पुणेने शहरात ‘इंदिरा पॅथलॅब्स’ हे नवे डायग्नॉस्टिक्स सेंटर सुरु केले आहे.  महिलांच्या व त्यांच्या भविष्यातील मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या स्थितींचे निवारण करण्यासाठी आई व बाळाच्या डायग्नोस्टिक गरजांवर याठिकाणी लक्ष केंद्रित केले जाते.

शहरातील गंभीर आकडेवारीविषयी इंदिरा आयव्हीएफ पुणेचे डॉ अमोल लुंकड यांनी सांगितले, “आमच्या संशोधनातून असे स्पष्टपणे दिसून येते की पुणे शहरात आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झालेली असून जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ होत आहे, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा खूप मोठा धोका आहे. हे आजार टाळता येऊ शकतात पण अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचे प्रमाण वाढत आहे, शहरीकरण, बैठी जीवनशैली, आहार व पोषणातील बदल व नियमित असुरक्षित सवयी यांचा यामध्ये समावेश आहे. या सवयींचे विपरीत परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर दीर्घकाळपर्यंत दिसून येतात, ज्यामुळे गंभीर आजार तसेच वंध्यत्व देखील येऊ शकते.”

पालकत्वाच्या प्रवासामध्ये वेळीच निदान केले जाणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करत इंदिरा पॅथलॅब्स पुणेच्या सिनियर पॅथॉलॉजिस्ट डॉ खुशबू मित्तल यांनी सांगितले, “आरोग्याच्या कोणत्याही समस्येचे लवकरात लवकर निदान केले जाणे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचे असते, त्यामुळे दीर्घकालीन आजार, गुंतागुंत होणे टाळले जाऊ शकते. आई होऊ इच्छिणाऱ्या महिलांना जर पीसीओडी, उच्च कोलेस्टेरॉल आणि स्थूलपणा असे त्रास असतील तर त्यांचे लवकरात लवकर निदान केले गेल्यास वंध्यत्वाच्या समस्यांचे निवारण करण्यात मदत मिळू शकते. गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असलेल्या जोडप्यांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे ज्यामुळे त्यांचे कुटुंब वाढवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.”

इंदिरा पॅथलॅब्स भारतातील ७ शहरांमध्ये असून त्यामध्ये मुंबई, नवी दिल्ली व पाटणा यांचा समावेश आहे ज्याठिकाणी जीवनशैलीशी निगडित आजारांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. अनेक विविध विश्वसनीय क्लिनिकल सेवासुविधांनी सुसज्ज असलेल्या इंदिरा पॅथलॅब्समध्ये उच्च दर्जाच्या डायग्नॉस्टिक्स सेवा सहज उपलब्ध होतात, ज्यामुळे गर्भधारणेचा संपूर्ण प्रवास सक्षमपणे पूर्ण करण्यात मदत मिळते आणि  निरोगी बाळ जन्माला येऊ शकते. इंदिरा पॅथलॅब्स पुणे सेंटरचे उदघाटन पुण्यातील भाजपा अध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading