Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

मायलेकीला बांधून वॉचमनने लुटले २४ लाख

पुणे : मायलेकीचे हात-पाय बांधून २३ लाख ६० हजारांचा ऐवज लुटून नेणाऱ्या वॉचमन कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वॉचमन महेश सुनार, त्याची पत्नी लक्ष्मी, त्याचा भाऊ कालु, त्याची पत्नी व इतर दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी या१९ वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना १० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास चिखली येथे घडली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी महेश सुनार हा फिर्यादी यांच्याकडे वॉचमन म्हणून कामाला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी महेश सुनार याने फिर्यादी आणि तिच्या आईला बहाणा करून खाली बोलविले. त्यानंतर बेडशिट आणि ओढणीच्या सहाय्याने त्यांचे हातपाय बांधून ठेवले. “अगर मुहसे आवाज निकाला तो जान से मार दुंगा” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी घरात जाऊन सोने-चांदी व हिऱ्याचे दागिने, रोख रक्‍कम असा एकूण २३ लाख ६० हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तसेच, जाताना पुरावा राहू नये यासाठी घरातील डीव्हीआर देखील जबरदस्तीने चोरून नेला. आरोपीच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांत रवाना करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading