सोनीने नवीन WF-1000XM5 चे वायरलेस इअरबड्स आजच बाजारात आणले आहेत. यात नॉईज कॅन्सलिंगचा उत्तम अनुभव आपल्याला मिळतो.
नवी दिल्ली – सोनीने आजच बाजारात आणलेल्या WF-1000XM5 हे वायरलेस इअरबड्स आहेत. प्रसिद्ध 1000X सिरीजमधील हे उत्कृष्ट इअरबड्स आहेत. हे अत्याधुनिक मॉडेल अत्यंत परफेक्ट आहे. यात तुम्हाला नको असलेला आवाज काढून हवे ते ऐकण्याची सोय आहे. त्यामुळे तुमचे आवडते संगीत आता तुम्ही WF-1000XM5 च्या साहाय्याने कोणत्याही अडथळ्याशिवाय ऐकू शकता.
या इअरबड्सच्या उद्घाटनप्रसंगी सोनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील नय्यर म्हणाले की, या अत्याधुनिक डिव्हाईसमुळे इअरबड्सची व्याख्याच बदलणार आहे. ऐकणाऱ्याला संपूर्ण समाधान मिळेल, अशा पद्धतीची याची रचना आहे. नकोसा आवाज रद्द करण्याची क्षमता, उत्तम दर्जाचा आवाज आणि हे सगळं अगदी किफायतशीर किंमतीत असे एक सुंदर प्रॉडक्ट सोनीने आणले आहे. हा या क्षेत्रातील नव्याने सेट झालेला मापदंड ठरेल, असे नय्यर म्हणाले. या इअरबड्सच्या साहाय्याने आम्ही या क्षेत्रात भारतातच नव्हे तर जगात सर्वोत्कृष्ट ठरण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे नवीन WF-1000XM5 इअरबड्स ग्राहकाला विनाअडथळा गाणी ऐकण्याचा आनंद देतील. ऑडिओच्या क्षेत्रात सोनीचे पूर्वीपासून नाव आहे. त्यामुळे या इअरबड्सवर तुम्ही निश्चित विश्वास ठेवू शकता. अशा प्रकारची सोय देणारे हे पहिलेच उपकरण आहे. याचे फीचर्स इतके उत्तम आहेत की, तुम्हाला स्टुडिओत आर्टिस्टच्या समोरच बसून गाणी ऐकतो आहोत असे वाटेल.
या प्रत्येक इअरबड्समध्ये तीन मायक्रोफोन आहेत. यात ड्युअल फीडबॅक माइकचा देखील समावेश आहे. अन्य आवाज काढून टाकण्याच्या बाबतीत सोनीचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि अनोखे पाऊल आहे.
सोनीच्या नव्याने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाने आवाज अगदी क्रिस्टल क्लिअर येतो. इअरबड्समध्ये 360 रिअॅलिटी ऑडिओ आहे, जो एक अनोखा अनुभव देतो. बारीक आवाजापासून ते सखोल बासपर्यंत, सर्व काही WF-1000XM5 वर संगीतासाठी ट्यून केले आहे.
WF-1000XM5 इयरबड्स हे हेड ट्रॅकिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. यात तुमच्या डोक्याच्या हालचालीनुसार आवाज ऍडजस्ट करण्यात येतो. सुसंगत स्मार्टफोन/सेवेशी कनेक्ट करून तुम्हाला संगीताचा संपूर्ण अनुभव देण्यासाठी कार्यरत आहे.
WF-1000XM5 मध्ये आता सोनीची सर्वोत्कृष्ट कॉल क्वालिटी3 आहे, तुम्ही ऑफिसमध्ये असाल, घरातून काम करत असाल, सार्वजनिक जागेत किंवा गोंगाटाच्या ठिकाणी असलात तरी प्रत्येक परिस्थितीत तुमचा आवाज स्पष्टपणे पोहोचवते. एआय-आधारित आवाज कमी करण्याचा अल्गोरिदम देखील येथे आहे.
WF-1000XM5 मध्ये Sony ची लोकप्रिय वैशिष्ट्ये जसे की अडॅप्टिव्ह साउंड कंट्रोल आणि स्पीक-टू-चॅट तसेच मल्टीपॉइंट कनेक्ट जे तुम्हाला एकाच वेळी दोन ब्लूटूथ डिव्हाइस जोडू देते.
WF-1000XM5 मध्ये ऑपरेशन-फ्री ऐकण्याच्या अनुभवासाठी ऑटो प्ले देखील आहे. तुम्ही तुमच्या प्राधान्यानुसार संगीताची वेळ सेट करू शकता.
या डिव्हाइसचे बॅटरी लाइफ ८ तास एवढे आहे. विशेष म्हणजे याचे चार्जिंग अवघ्या तीन मिनिटांत होते आणि ते तासभर चालते. यामुळे तुम्ही तासनतास अखंडित गाणी ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. याव्यतिरिक्त, Qi तंत्रज्ञान सोपे वायरलेस चार्जिंग ऑफर करते.
किंमत आणि उपलब्धता
Sony India ने WF-1000XM5 साठी विशेष प्री-बुकिंग ऑफर जाहीर केली आहे. ग्राहक आता २१ हजार ९९९ रु.च्या विशेष किमतीत (रु. ३ हजार कॅशबॅकसह) प्री-बुकिंग करू शकतात. या प्री-बुक ऑफर अंतर्गत ४ हजार ९९० रुपयांचे SRS-XB100 पोर्टेबल स्पीकर देखील मोफत मिळतील. ही प्री-बुकिंग ऑफर २७ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होते आणि भारतातील सोनी सेंटर, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स पोर्टल यांसारख्या सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन ठिकाणी ती १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू असेल.
मॉडेल | सर्वोत्तम खरेदी किंमत (in Rs.) | प्री बुकिंग किंमत
१५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत (in Rs.) |
मिळण्याची तारीख | रंग |
WF-1000XM5 | 24,990/- | 21,990/- | 18 ऑक्टोबरपासून | ब्लॅक आणि प्लॅटिनम सिल्व्हर |