Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘एक फुल  दोन हाफ’ अजून नांदेडला का गेले नाहीत ?; उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई : नांदेड, ठाणे, संभाजीनगर, नागपूर येथील रुग्णालयात दिवसागणीक मृत्यूचा आकडा वाढत आहे. आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले पाहून संताप येतोय. कोरोनाचा संकट होतं तेव्हा मविआचा सरकार होते. त्यावेळी याच आरोग्य यंत्रणेने कोरोनाचा सामना केला होता. तेव्हा देखील मनुष्यबळ अपुरे होते. आता याच आरोग्य यंत्रणेला बदनाम केलं जात आहे. कोरोना सारखी कोणतीही सात नसताना होत असलेल्या नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असे म्हणत ‘आता एक फुल दोन हाफ कुठे आहेत?’, असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केला.

सरकारकडे मौजमजा करायला पैसे आहेत

सरकारी आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. कारण येथे पुरेसे मनुष्यबळ, औषधांचा योग्य पुरवठा नाही. कारण राज्य सरकार व आरोग्य विभागाकडे खर्च करण्यास पुरेसे पैसे नाहीत , असे कारण दिले जात आहे. यांच्याकडे केवळ जाहिराती करायला, गोवा, गुवाहटी येथे जावून मजामस्ती करायला पैसे आहेत. परंतु रुग्णांवर उपचार करायला पैसे नाहीत. अशा सरकारची सीबीआय चौकशी मागणी उद्धव ठाकरेंन केली आहे.

नांदेड सरकारी रुग्णालयाच्या डिनवर गुन्हा का दाखल केला?

ठाणे, नांदेड, संभाजीनगर, नागपूर येथील सर्वच सरकारी रुग्णालयात रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, यातील केवळ नांदेड येथील  सरकारी रुग्णालयाच्या डिनवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाकीच्या ठिकाणी असे गुन्हे का दाखल करण्यात आलेले नाही. नांदेड सरकारी रुग्णालयाच्या डिनला हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी सौचालय साफ करण्यास सांगितले म्हणून त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन् त्यामुळेच नांदेड सरकारी रुग्णालयाच्या डिनवर गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading