Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

प्रबोधनात्मक समाजकार्यबद्दल लक्ष्मीकांत खाबिया यांचा वारकरी संमेलनात सन्मान

 

पुणे : अध्यात्म, अध्यात्मातून प्रबोधन व प्रबोधनातून विचरांमध्ये होणारे मतपरिवर्तन या संतांच्या त्रिसूत्रीचा अवलंब करून शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्य करीत असल्याबद्दल लक्ष्मीकांत खाबिया यांचा खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला.
भागवत वारकरी महासंघातर्फे मुक्ताई गार्डन, चऱ्होली फाटा (ता. हवेली) येथे एकदिवसीय भागवत वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात खाबिया यांचा गौरव करण्यात आला. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार विलास लांडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, ह. भ. प. दिनकर शास्त्री भुकेले यांची प्रमुख उपस्थिती होती.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या नावाने भजन स्पर्धेच्या माध्यमातून संतांची विचारधारा युवा वर्गापर्यंत पोहोचविण्यात आली. 2006 ते 2010 या कालावधीत जगत्‌‍गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन स्पर्धेच्या माध्यमातून एडस्‌‍ आणि स्त्री भ्रुण हत्या यासारख्या ज्वलंत प्रश्नांना प्रबोधनाद्वारे सर्वसामान्य लोकांसमोर अत्यंत सोप्या भाषेत घेवून गेल्याबद्दल, आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने ‌‘विठू माझी माऊली माझी’ या कार्यक्रमाद्वारे सलग 24 वर्षे करीत असलेल्या संप्रदायाच्या सेवेबद्दल तसेच महाराष्ट्रातील 30 कारागृहांमधील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन स्पर्धा घेवून बंदीजनांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यात यश प्राप्त केले. महाराष्ट्रात राबविलेला गेलेला अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या बंदीजनांची 90 दिवसांची शिक्षा माफ करण्यात आली. या कार्याबद्दल खाबिया यांचा गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading