Sunday, June 14, 2026
BusinessLatest News

महाराष्ट्रात गुंतवणूकदार ऋण आणि इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करतात: टाटा ऍसेट मॅनेजमेंट

जळगाव :  इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये ऑगस्ट २०२३ मध्ये एकूण २०२४५.२६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची आल्याची माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाकडून मिळाली आहे. याच एएमएफआयकडील माहितीनुसार, इक्विटी म्युच्युअल फंड विभागात स्मॉल-कॅप विभागात ४२६४.८२ कोटी रुपये, सेक्टरल/थेमॅटिक फंड्समध्ये ४८०५.८१ कोटी रुपये आणि मल्टी-कॅप विभागात ३४२२.१४ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचे समजले आहे. एएमएफआयकडील अलीकडच्या माहितीनुसार, भारतात एकंदरीत म्युच्युअल फंड क्षेत्रात एकूण ४६.६३ लाख कोटी रुपयांच्या संपत्ती व्यवस्थापनांतर्गत असल्याचे समजले आहे, यामध्ये क्लोज-एन्डेड स्कीम्सचा समावेश आहे.

भारतात म्युच्युअल फंड संपत्तींमध्ये सातत्याने वाढ होत असताना आम्हाला त्यामध्ये एक विशिष्ट पॅटर्न दिसून येत आहे, काही राज्ये नॉन-इक्विटीपेक्षा इक्विटी म्युच्युअल फंड योजनांना प्राधान्य देत आहेत. पण महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीच्या बाबतीत संतुलित दृष्टिकोन स्वीकारल्याचे दिसून येते. एएमएफआयकडील अगदी अलीकडच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ३३% गुंतवणूक इक्विटी योजनांमध्ये तर ३७% गुंतवणूक ऋण व लिक्विड योजनांमध्ये केली गेली आहे, ४% गुंतवणूक संतुलित फंड्समध्ये आणि २५% गुंतवणूक एक्स्चेंज ट्रेडेड फंड्समध्ये केली गेली आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये १९,५८,०४३.९१ कोटी रुपये गुंतवले आहेत.

पण टाटा म्युच्युअल फंडला महाराष्ट्रामध्ये एक वेगळा ट्रेंड आढळून आला आहे, ज्यामध्ये टाटा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी डेट म्युच्युअल फंड योजनांना प्राधान्य दिले आहे. टाटा म्युच्युअल फंडामध्ये महाराष्ट्रात जवळपास ३२% व्यवस्थापनांतर्गत संपत्ती इक्विटी योजनांमधून, ६०% डेट व लिक्विड योजनांमधून आणि ७% संतुलित योजनांमधून येते असे एएमएफआयच्या अलीकडच्या माहितीवरून समजते.

इक्विटी विभागात गुंतवणूकदारांनी टाटा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंडसारख्या सेक्टरल फंड्सना प्राधान्य दिले आहे, ही एक ओपन-एन्डेड इक्विटी योजना आहे जी बँकिंग व फायनान्शियल सेवा क्षेत्रात गुंतवणूक करते. याठिकाणी हे ध्यानात घेतले पाहिजे की, टाटा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड हा अतिशय उच्च जोखीम विभागात येतो.

टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे फंड मॅनेजर  अमेय साठे यांनी सांगितले, “टाटा ऍसेट मॅनेजमेंटमध्ये आम्ही गुंतवणूक प्रक्रिया व गुंतवणुकीच्या बाबतीत शिस्तबद्ध दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करतो. सेक्टरल फंड्ससहित सर्व म्युच्युअल फंड योजनांमध्ये आम्ही ग्रोथ ऍट रिजनेबल प्राईस दृष्टिकोन बाळगतो. जीएआरपी दृष्टिकोनामुळे आम्हाला उच्च गुणवत्तापूर्ण शेयर्सवर बोली लावता येते आणि त्याचवेळी हे देखील सुनिश्चित करता येते की गुणवत्तापूर्ण शेयर्स योग्य किमतींना विकत घेतले जात आहेत. आम्ही असे मानतो की, सध्या व्यापक बाजारपेठांमध्ये मजबूत वृद्धी व री-रेटिंगच्या अनेक वेगवेगळ्या संधी आहेत आणि आमच्या टाटा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंडमध्ये आम्ही त्या संधींचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतीय अर्थव्यवस्था या उत्क्रांतीच्या अतिशय महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. वेगवान वृद्धी, सर्वसमावेशक वृद्धी, संपत्ती निर्मिती, मुबलक रोजगार, अधिक चांगले जीवनमान, दर्जेदार पायाभूत सोयीसुविधा आणि मूलभूत बँकिंग सुविधांची उपलब्धता अशा अनेक अपेक्षा आहेत. बँका व एनबीएफसी या संघटित ऋणदात्यांसाठी भारतातील ग्राहक ऋण क्षेत्रांत भरपूर संधी आहेत. येत्या काळातील वृद्धीचे संचालन वेगवेगळी इंजिने करतील, बँका आणि एनबीएफसीनी विविध प्रकारची उत्पादने तयार केली आहेत ज्यामध्ये विविध सुरक्षित ऋण पर्यायांचाही समावेश आहे. एकंदरीत आम्ही असे मानतो की, निवडक बँका व एनबीएफसी त्यांच्या नैपुण्याचा व बाजारपेठेतील त्यांच्या स्थानाचा वापर करून स्वतःची रिटेल लोन बुक्स बाजारपेठेतील अनुमानापेक्षा जास्त प्रमाणात वाढवतील. भारतातील ग्राहक ऋण पातळी इतर उदयोन्मुख व विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा खूप कमी आहेत, येत्या काही वर्षात भारतीय बँकिंग व्यवस्थेच्या वृद्धीला चालना देणारा हा एक महत्त्वाचा घटक असणार आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading