Sunday, June 21, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

Crime News : गुजरातमध्ये ८०० कोटींचे ड्रग्ज जप्त

अहमदाबाद : गुजरात पोलिसांना अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुजरातमध्ये ८०० कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. कच्छ जिल्ह्यातील गांधीधाममध्ये पोलिसांनी हे ८० किलो कोकन जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत ८०० कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी किनार्‍यावरून ८० किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. सुत्रांकडून यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी शोध सुरु केला. यावेळी पोलिसांना समुद्रात लावारिसपणे अंमली पदार्थांची पाकीटे सापडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीधाम शहराजवळील खाडीच्या काठावर ८० पॅकेटमध्ये कोकेन सापडले आहे. प्रत्येक पॅकेटचे वजन एक किलोग्रॅम आहे. कच्छ-पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितले की, कदाचित पकडले जाण्याच्या भीतीने तस्करांनी येथे ड्रग्ज टाकून पळ काढला असावा, कारण पोलीस या ठिकाणी लक्ष ठेवून होते. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गांधीधाम पोलिसांनी ८० किलो कोकेन जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे ८०० कोटी रुपये आहे. या यशाबद्दल मी डीजीपी आणि गांधीधाम पोलिसांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading