सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लिगचे प्रमोटर्स या लीगसाठी पुढील तीन वर्षांत १५० कोटी रुपयांची करणार गुंतवणूक
पुणे : सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लिगने पुढील तीन वर्षांमध्ये १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना जाहीर केली आहे. तीन वर्षांत भारतभरात जागतिक पातळीच्या रेसिंग पायाभूत सुविधा उभारणे, सर्व प्रकारचा विकास आणि जागतिक दर्जाचे इव्हेंट या गुतवणुकीच्या माध्यमातून आयोजित केले जाणार आहेत. भारतात खेळ आणि साहस आवडणारे जास्त आहेत. ते लक्षात घेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा इव्हेंट पोहोचवण्यासाठी निर्मितीमध्येही ही लिग गुंतवणूक करणारा आहे.
या धोरणात्मक गुंतवणुकीच्या माध्यमातून आयएसआरएल भारतात हा इव्हेंट जागतिक दर्जाचा करणार असून त्याद्वारे भारतातील मोटरस्पोर्ट्स फॅन्सचे मने जिंकली जाणार आहेत. भारत मोटोजीपी या उपक्रमाने यश मिळवल्यानंतर लगेच हा इव्हेंट येत असून मोटरसायकल रेसिंगचे नवे युग सुरू झाल्याचे हे द्योतक आहे.
या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीद्वारे ही लिग जास्तित जास्त लोकांमध्ये पोहोचवण्याचे आणि त्याची लोकप्रियता वाढवण्याचे नियोजन आहे. सुपरक्रॉसला प्रीमियर मोटरस्पोर्ट्सचे स्थान मिळवून देणे आणि अधिकाधिक प्रेक्षकांना जोडणे याचा उद्देश आहे.
सुपरक्रॉस इंडिया प्रा. लि.चे सहसंस्थापक आणि संचालक श्री वीर पटेल म्हणाले की, केवळ रेसट्रॅकपुरते न राहता त्याही पुढे जाऊन भारतातील सुपरक्रॉस हा रेसिंग इव्हेंट जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचे उद्दिष्ट आहे. जगभरातील चालक आणि चाहते सर्वोतमाचा नवा आदर्श प्रस्थापित करतील. भारतातील हुशार तरुणांना आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर त्यांच्यातील कौशल्य दाखवता यावे यासाठी ही भरीव गुंतवणूक केली जात आहे.
या भरीव गुंतवणुकीमुळे आम्हाला जगभरात होणाऱ्या सुपरक्रॉस इव्हेंट्सपेक्षा मोठी तथा भव्यदिव्य करता येईल आणि त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान तथा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बळही मिळेल. या इव्हेंटमधून असा अनुभव येईल की त्यामुळे केवळ चाहते मनमोहित होणार नाहीत तर पुढच्या पिढीतील रायडर्सनाही प्रेरणा मिळेल आणि हा खेळ एका नव्या उंचीवर पोहोचेल.
सुपरक्रॉस इंडिया प्रा. लि.चे सहसंस्थापक आणि संचालक श्री ईशान लोखंडे म्हणाले की, भारतातील सुपरक्रॉस रेसिंग जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी सीएट आयएसआरएल ही एक प्रकारे मोठी ऊर्जा आहे. हा केवळ एक साहसी खेळ म्हणून आम्ही पाहात नाहीत तर भारताचे स्थान आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्ट्समध्ये रस असणाऱ्यांसाठी महत्त्वाचे स्थान मिळवून देणे हा आमचा उद्देश आहे. ही गुंतवणूक एक प्रकारे या उत्साहपूर्ण प्रवासाची सुरुवात आहे. या साहसी प्रवासात आमच्यासोबत यावे, असे आवाहन आम्ही करत आहोत. भारतात मोटरस्पोर्ट्सला मोठी संधी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आता वर्ल्डकप असल्यामुळे आम्ही एक पाऊल उचलून ही लीग एक महिना पुढे ढकलली आहे. त्यामुळे या खेळाच्या चाहत्यांचे लक्ष इतर खेळाकडे राहणार नाही. सर्व चाहत्यांचे लक्ष मोटरस्पोर्ट्सकडेच राहील. जागतिक दर्जाची स्पर्था आयोजित करून संपूर्ण जगात सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग ही स्पर्धा चर्चेत राहावी आणि त्यामुळे देशाभिमान वाढावा तसेच आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्ट्स विश्वात याचे स्थान निर्माण व्हावे, असा आमचा उद्देश आहे.
सीएट आयएसआरएलच्या नियोजनानुसार ही लिग लवकरच सुरू होणार असून, पहिले सेशन डिसेंबर २०२३ मध्ये पार पडणार आहे. आधीच्या नियोजनानुसार हे पहिले सत्र ऑक्टोबर महिन्यात होणार होते. पण या काळात क्रिकेट वर्ल्डकप असल्यामुळे त्यात बदल करण्यात आले. पहिल्या सत्रात विविध ठिकाणी रेस होणार आहेत आणि पुढील वर्षी दुसऱ्या सत्रात सहा ठिकाणी स्पर्धा घेण्याचे नियोजित आहे.
सध्या रायडर्सना आपली नोंदणी करता येत आहे. ७५ रायडर्सनी सध्या नोंदणीही केले आहे. त्यातून एक गट तयार केला जात असून त्यातून मग टीम्स तयार केल्या जाणार आहेत. लीगमध्ये ६ ते ८ टीम्स उद्घाटनाच्या सेशलमध्ये असतील आणि पुढील सत्रांत टीमची संख्या ८ ते १० अशी आणखी वाढवली जाणार आहे.
सीएट आयएसआरएल रायडर पूलमध्ये दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे सुपरक्रॉस चॅम्पियन्सचा समावेश आहे. शिवाय यात इतर आंतरराष्ट्रीय रायडर्सचाही समावेश असून हा खऱ्या अर्थाने जागतिक इव्हेंट ठरणार आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये याबद्दलची अधिक माहिती, रायडर्स आणि टीम्सची माहितीही जाहीर केली जाणार आहे.
सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या उद्घाटन सोहळ्यात थरारक रेस पाहायला मिळणार आहे. यात चार रेसिंग गट असतील. केवळ ४५० सीसी आंतरराष्ट्रीय रायडर्स, केवळ २५० सीसी आंतरराष्ट्रीय रायडर्स, २५० सीसी इंडिया एशिया मिक्स आणि ८५सीसी ज्युनिअर क्लास असे हे चार गट असतील. ही लीग भारतात सुपरक्रॉसचा एक नवा अध्याय सुरू करणार आहे आणि देशभरातील मोटरस्पोर्ट्स चाहत्यांमध्ये नवा उत्साह-जोश भरणार आहे.
रायडर नोंदणी, प्लेअर ऑक्शन आणि आयएसआरएलच्या पहिल्या सत्राचे नियोजन ही सर्व माहिती मिळवण्यासाठी कृपया एसएक्सआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://indiansupercrossleague.com/
