Wednesday, June 10, 2026
BusinessLatest News

पूनावाला फिनकॉर्पची इंडसइंड बँकसोबत को-ब्रांडेड क्रेडिट कार्डसाठी भागीदारी

  • असाधारण असे बेस्ट-इन-क्लास ग्राहक केंद्रित उत्पादन ऑफर्स
  • चांगला क्रेडीट स्कोअर आणि इतिहास असलेल्या ग्राहकांना लक्ष्य करण्याचा उद्देश्य
  • 100% डिजिटल प्रक्रिया

पुणे : पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड या सायरस पूनावाला समूहाद्वारे प्रवर्तित नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडून इंडसइंड

बँकसोबत को-क्रेडीट कार्ड जारी करण्याची परवानगी मिळाली आहे. हे क्रेडीट कार्ड तीन महिन्यांच्या आत जारी करण्याचा कंपनीचा विचार आहे. ही भागीदारी पूनावाला फिनकॉर्पला फ्लेक्सिबल आणि वर्सेटाइल रिटेल क्रेडिटच्या नवीन युगाचा हिस्सा बनण्यास सक्षम करेल.

या बद्दल आनंद व्यक्त करताना, पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक अभय भुतडा म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की इंडसइंड बंकेसोबतची ही भागीदारी तंत्रज्ञान जाणणाऱ्या आणि आर्थिक जाण असणाऱ्या भारताच्या ग्राहकांसाठी एक  निर्णायक टप्पा आणि आमच्या नवीन युगाच्या फाइनेंशियल प्रोडक्ट सोबत जोडेलपूनावाला फिनकॉर्प मध्ये आम्ही आमच्या ग्राहकांशी संवाद साधताना संपूर्ण पारदर्शकतेसह आणि कोणतेही छुपे शुल्क न घेता नीतीपूर्ण कर्ज देण्यावर विश्वास ठेवतो. संपूर्ण डिजिटल प्रक्रियेसह असाधारण बेस्ट-इन-क्लास उत्पादन ऑफर्ससह, आम्ही आमच्या वर्तमान आणि संभाव्य ग्राहकांना अखंड ग्राहक अनुभव प्रदान करण्याची अपेक्षा ठेवतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading