Sunday, June 14, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतली हमालांची भेट

नवी दिल्ली : काही दिवसापूर्वी आनंद विहार रेल्वे स्टेशनच्या हमाल बांधवांनी राहुल गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. राहुल गांधींनी त्यांची इच्छा पूर्ण केली असून ते त्यांना भेटण्यासाठी गुरुवारी सकाळी आनंद विहार रेल्वे स्टेशनवर पोहचले. यावेळी राहुल गांधी यांनी हमालांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती जाणून घेतली. या दरम्यान राहुल गांधी हमालाच्या भूमिकेत दिसले. तसेच रेल्वे स्टेशनच्या हमाल आणि रिक्षाचालकांनी आनंद व्यक्त केला आहे.

राहुल गांधींनी हमालांचा लाल गणवेश परिधान केला आणि हाताला ७५६ नंबरचा बिल्ला देखील बांधून घेतला. विशेष म्हणजे, यानंतर राहुल गांधींनी रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांचे सामान देखील डोक्यावर उचलले. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर हमाल आणि रिक्षाचालक खूप आनंदी दिसत होते. हमालांनी आपला आनंद व्यक्त करताना म्हटले की, राहुल गांधी आम्हाला भेटायला आले याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. राहुल गांधी यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, ते आम्हा हमालांच्या सर्व समस्या सरकारसमोर ठेवतील आणि त्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील.

भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून राहुल गांधी देशातील विविध समाज घटकांची भेट घेत आहेत आणि त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. याआधी देखील राहुल गांधींनी मेकॅनिकची भेट घेतली होती, छोट्या उद्यागांतील कुकची भेट घेतली होती आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. राहुल गांधींबद्दल विशेष बाब म्हणजे, ते ज्यांना भेटायला जातात तिथे अगदी त्यांच्यासारखे आणि त्यांच्या वेशातच वावरतात. त्यामुळेच राहुल गांधी यांचे असे फोटो, व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात आणि जनतेच्या पसंतीस देखील उतरतात.

काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले आहे की, राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर हमाल बांधवांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी मनमोकळेपणाने सर्व हमालांशी संवाद साधला आणि त्यांचे म्हणणे ऐकले. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरूच आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading