Wednesday, June 10, 2026
BusinessLatest News

पुणे येथील स्टार्टअप ठरले विजयाचे मानकरी

पुणे- भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या सहयोगाने द/नज सेंटर फॉर सोशल इनोव्हेशन (सीएसआय) आणि आशीर्वाद बाय एलिअॅक्सिस ह्यांनी स्मार्टटेरा व सोलिनाज इंटिग्रिटी ह्यांच्या नावाची घोषणा आशीर्वाद वॉटर चॅलेंजचे (एडब्ल्यूसी) विजेते म्हणून केली.१८ सप्टेंबर, २०२३ रोजी ही घोषणा करण्यात आली. ह्यापैकी स्मार्टटेराचा प्लॅटफॉर्म पुण्यात तर सोलिनाज इंटिग्रिटीचा प्लॅटफॉर्म नागपूरमध्ये आधीपासून सक्रिय आहे.१४०हून अधिक अर्जांमधून, तज्ज्ञ मूल्यमापन व प्रत्यक्ष क्षेत्रीय परीक्षणांचा समावेश असलेल्या कठोर निवड प्रक्रियेद्वारे, निवडक अर्जांची एक छोटी यादी तयार करण्यात आली. ह्या छोट्या यादीतून, ह्या दोन स्टार्ट-अप्सची विजेते म्हणून निवड करण्यात आली. ही स्पर्धा फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झाली असून, सर्वांना स्वच्छ पेयजल मिळवून देण्याच्या गंभीर समस्येवर मात करण्याचे ध्येय स्पर्धेपुढे आहे. भारतातील जल संकटावर नवोन्मेषकारी, प्रभावी आणि तंत्रज्ञानाधारित उपाय शोधून काढण्याचे तसेच शहरी व ग्रामीण समुदायांमधील आरोग्य व वैयक्तिक  स्वच्छतेची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने स्वच्छ पेयजलाची उपलब्धता व्यापक करण्याचे उद्दिष्ट आशीर्वाद बाय एलिअॅक्सिसचे पाठबळ असलेल्या ‘द/नज प्राइझ : आशीर्वाद वॉटर चॅलेंज’पुढे आहे. स्मार्टटेराचा एआयवर आधारित डेटा अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म पाणी पुरवठा यंत्रणांना गळके पाइप व संशयित/सदोष पाणी मीटर्स शोधून काढून पाण्याची हानी कमी करण्यात मदत करतो, तर सोलिनाज इंटिग्रिटीचे ‘एण्डोबॉट’ रोबोटिक सोल्युशन गळती व पाणी दूषित होण्याची प्रकरणे शोधून पाइपलाइन संरचना सुरक्षित ठेवते.उपाययोजनाची परिणामकारकता, आर्थिक व्यवहार्यता, व्याप्तीची संभाव्यता आणि पाण्याचे शुद्धीकरण, साठवण, वितरण, पुनर्वापर व उपलब्धता ह्यांसंदर्भातील समस्यांवर मात करण्याची क्षमता ह्या निकषांवर विजेत्यांची निवड करण्यात आली.

 “एडब्ल्यूसीच्या ह्या टप्प्याचा आव्हान ते परिवर्तन हा प्रवास आमचे सल्लागार, परिसंस्थेतील सहयोगी आणि स्पर्धकांचे अतूट चैतन्य ह्यांशिवाय अपूर्ण राहिला असता! अंतिम फेरीत आलेल्या सर्व 7 स्पर्धकांनी, जल मूल्यसाखळीमध्ये अधिक कार्यक्षम, सुरक्षित, खात्रीशीर जलमार्ग विकसित करण्यापासून ते स्रोत अधिक शाश्वत करण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये अनेक नवोन्मेष साध्य केले व चाकोरीबाह्य मूल्य निर्माण केले. सांडपाण्यातून आर्थिक मूल्यनिर्मिती करण्यापासून ते सुरक्षित पाण्याच्या निश्चितीसाठी वापर मापनीय करण्यापर्यंत अनेक नवोन्मेषकारी व चाकोरीबाह्य प्रयत्न ह्यातून पुढे आले! ह्या उपाययोजना भारताला सर्वांसाठी स्वच्छ पाणी पुरवण्यात पुढे घेऊन जातील असा आत्मविश्वास मला वाटतो. तंत्रज्ञानाचा लाभ खूप महत्त्वाचा आहेच पण ह्या स्पर्धकांनी प्रभाव व मूल्य निर्माण करण्यासाठी ज्या कळकळीने काम केले ती बघता मला हा प्रयत्न ठरल्याची ग्वाही मिळाली!”, असे द/नज प्राइझच्या संचालक कनिष्का चॅटर्जी म्हणाल्या. स्पर्धकांना ह्या स्पर्धेदरम्यान सहाय्य करणाऱ्या परिसंस्था सहयोगींमध्ये जल जीवन मिशन, कॅस्पियन, आयएनआरईएम फाउंडेशन, इंडस वॉटर इन्स्टिट्यूट, वॉटरएड, आयएचई डेल्फ्ट आणि अन्य काही कंपन्यांचा समावेश होतो. द/नज- आशीर्वाद वॉटर चॅलेंजची महाअंतिम फेरी १८ सप्टेंबर, २०२३ रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटाट सेंटरमध्ये पार पडली. ह्यावेळी विनी महाजन (सचिव, पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय),  बिश्वेस्वर तुडु (राज्यमंत्री, जलशक्ती व आदिवासी व्यवहार, भारत सरकार) आणि जल क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ह्या सोहळ्यातच आशीर्वाद वॉटर चॅलेंजच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली. ह्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये अर्ज खुले होणे अपेक्षित आहे. ६ कोटी रुपयांची एकूण बक्षिसे दिली जाणारी ही भारतातील सर्वांत मोठ्या स्पर्धांपैकी एक आहे. पाणी व उपजीविकेच्या क्षेत्रात शाश्वत उपाययोजना करण्यासाठी नवोन्मेष व व्याप्तीला ही स्पर्धा उत्तेजन देते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading