fbpx
Tuesday, September 26, 2023
Business

फोक्सवॅगन इंडियाने महाराष्ट्रातील आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे : फोक्सवॅगन इंडिया हडपसरमध्ये नवीन अत्याधुनिक 3S (विक्री, सुटे आणि सेवा) सुविधेसह पुण्यातील ग्राहकांच्या जवळ आली आहे. संपूर्ण भारतात नेटवर्क विस्तारात सातत्य राखत पुणे शहरात आता तीन विक्री आणि दोन सेवा टचपॉइंट्स असून ते विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांच्या विक्री आणि सेवा आवश्यकता पूर्ण करतात.

फोक्सवॅगन पुणे, बी यू भंडारीचे व्यवस्थापकीय संचालक  शैलेश भंडारी यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत आहे. ते ग्राहकांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या पसंतीची फोक्सवॅगन निवडण्यात मदत करणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा केंद्रातील १८० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या एका मजबूत संघाचे नेतृत्व करतात. फोक्सवॅगन पुणेच्या नवीन उद्घाटन झालेल्या केंद्रात सहा कार डिस्प्लेद्वारे तैगुन, व्हरटस आणि टिगुआन यांचा समावेश असलेला  भारतातील सर्वात सुरक्षित उत्पादन पोर्टफोलिओ सादर करण्यात येत आहे.

फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता म्हणाले, “पुणे हे शहर आमच्या ब्रँडच्या अगदी जवळ आहे, कारण ते भारतातील फोक्सवॅगनचे होम ग्राउंड आहे. आम्ही आमच्या भारतातील प्रवासाची सुरुवात पुण्यातून केली आणि हे शहर आर्थिक, सामाजिक, तांत्रिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या बाबतीत प्रचंड वाढताना बघत आहोत. फोक्सवॅगन ब्रँडला आपल्या ग्राहकांच्या आणखी जवळ नेत आमच्या दीर्घकालीन डीलर भागीदारासोबत हडपसर येथे आणखी एक नवीन टचपॉइंट सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.”

उद्घाटनपर भाष्य करताना बी यू भंडारीचे व्यवस्थापकीय संचालक  शैलेश भंडारी म्हणाले, “फोक्सवॅगन हडपसर ही अत्याधुनिक ३ एस (विक्री, सुटे भाग, सेवा) सुविधा केंद्र असून सध्याच्या आणि संभाव्य ग्राहकांच्या  विक्री आणि सेवा गरजा पूर्ण करण्यासाठी सुसज्ज आहे. भारतातील सर्वात सुरक्षित उत्पादन पोर्टफोलिओ सादर करणारे एक नवीन सुविधा केंद्र शहरात सुरू करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत असून त्यामुळे ग्राहकांना दळणवळणासाठी योग्य त्या साधनाची निवड करता येऊ शकेल. आम्ही हडपसर येथील फोक्सवॅगन पुणे येथे आमच्या ग्राहकांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत.”

अखंड आणि आनंददायी ग्राहक अनुभवाची खात्री करून, फोक्सवॅगन पुणेकडे एक विस्तृत ४२ सर्व्हिस बे असून ते नियमित सेवा देखभाल आणि दुरुस्तीची पूर्तता करतात. ग्राहकांच्या सोयीसाठी, फोक्सवॅगन असिस्टन्स आणि मोबाईल सर्व्हिस युनिटद्वारे घरी येऊन गरजेची सेवापूर्ती केली जाते. आजमितीस, भारतातील फोक्सवॅगनची एकूण नेटवर्क क्षमता १८८ विक्री टचपॉइंट्स आणि १३३ सेवा सुविधा केंद्रे अशी असून त्यापैकी १८ विक्री टचपॉइंट आणि १६ सेवा सुविधा महाराष्ट्र राज्यात आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: